दुसऱ्या टी-२० सामन्यात फिरकीपटू यजुवेंद्र चहलनं वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची बरोबरी केली आहे. दुसऱ्या सामन्या चहलनं महागडी गोलंदाजी करत एक विकेट घेतली. बुमराहची ही टी-२० क्रिकेटमधील ५९ वी विकेट होती. आता बुमराह आणि चहल टी-२० भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. बुमराह आणि चहल यांच्या नावावर टी-२० किक्रिकेटमध्ये प्रत्येकी ५९ विकेट आहेत.

चहलनं पहिल्या टी-२० मध्ये तीन विकेट घेतल्या होत्या. आता दुसऱ्या सामन्यात एक विकेट घेत बुमराहच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बुमराह-चहलनंतर भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज अश्विन आणि भुवनेश्वर कुमार आहेत. दोघांच्या नावावर अनुक्रमे ५२ आणि ४१ विकेट आहेत.

टी-२० मध्ये भारताकडू सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज –

 

पहिल्या टी-२० सामन्यात चहलनं महागाडी गोलंदाजी केली. चहलच्या चार षटकांत कांगांरुंनी धावांचा पाऊस पाडला. चहलनं चार षटकांत ५१ धावा देत फक्त एक विकेट घेतली. चहलच्या चार षटकांत तब्बल पाच षटकार लगावले आहेत.


कर्णधार मॅथ्यू वेडचं अर्धशतक आणि त्याला स्टिव्ह स्मिथने फटकेबाजी करत दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात १९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताला हा सामना जिंकण्यासाठी १९५ धावांचं आव्हान मिळालं आहे. भारतीय संघाने आजच्या सामन्यात क्षेत्ररक्षणात निराशाजनक कामगिरी केली. परंतू मोक्याच्या षटकांमध्ये कांगारुंना मोठे फटके खेळण्यापासून रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. परंतू डेथ ओव्हर्समध्ये फटकेबाजी करुन ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा सामन्याचं पारडं आपल्या बाजूने फिरवलं. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार वेडने ५८ तर स्मिथने ४६ धावांचं योगदान दिलं.