News Flash

भारत विरुद्ध इंग्लंड दिवस-रात्र कसोटी सामन्याचा मान अहमदाबादच्या मोटेरा मैदानाला

BCCI सचिव जय शहा यांची माहिती

इंग्लंडच्या आगामी भारत दौऱ्यादरम्यान दिवस रात्र कसोटी सामन्याच्या आयोजनाचा मान अहमदाबाद येथील मोटेरा मैदानाला मिळाला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यासंदर्भात घोषणा केली. २४ फेब्रुवारीपासून या सामन्याला सुरुवात होणार असून बीसीसीआय लवकरच या दौऱ्याचं अधिकृत वेळापत्रक जाहीर करेल. कसोटी सामन्याव्यतिरीक्त या मैदानावर टी-२० सामनेही खेळवले जाणार असल्याचं कळतंय.

“७ फेब्रुवारीपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल आणि दिवस-रात्र कसोटी सामन्याचं आयोजन २४ फेब्रुवारीपासून मोटेरा मैदानावर होईल. टी-२० सामन्यांची मालिकाही मोटेरावर खेळवली जाईल.” गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या इनडोअर क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनावेळी जय शहा यांनी ही माहिती दिली. इंग्लंडचा संघ २०२० मध्ये भारत दौऱ्यावर येणार होता. मात्र करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता हा दौरा पुढे ढकलण्यात आला. २०२१ च्या सुरुवातीलाच भारत घरच्या मैदानावर इंग्लंडचा सामना करेल.

याआधी भारताने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे. या सामन्यात भारताने बाजी मारली होती, परंतू इंग्लंडसारखा प्रतिस्पर्धी समोर असताना घरच्या मैदानावर भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 3:58 pm

Web Title: motera stadium to host india vs england pink ball test from february 24 says bcci secretary jay shah psd 91
Next Stories
1 क्रिकेटव्यतिरीक्त विराटला आयुष्य आहे, स्टिव्ह स्मिथचा कोहलीला पाठींबा
2 संघात निवड करायची की नाही यावरुन होते मतभेद, मालिकावीराचा किताब पटकावत हार्दिकचं निवड समितीला उत्तर
3 ऋषभ पंत फक्त ऑस्ट्रेलियात फिरण्यासाठी गेला आहे, माजी भारतीय खेळाडूची टीका
Just Now!
X