महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये धोनीचा फॉर्म काहीसा ढासळला होता. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात धोनीने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. धोनीने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने महत्वाची भागीदारी रचत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. धोनीने 23 चेंडूत 40 धावा फटकावल्या, यामध्ये 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 षटकार लगावण्याची किमया साधली आहे.

अशी कामगिरी करणारा धोनी पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत धोनीने वन-डे क्रिकेटमध्ये 222, कसोटी क्रिकेटमध्ये 78 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 52 षटकार लगावले आहेत. सध्याच्या घडीला धोनीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 352 षटकार जमा आहेत.

अवश्य वाचा – IND vs AUS : जोडी तुझी-माझी ! कोहली-धोनीचं टी-20 क्रिकेटमध्ये षटकारांचं अर्धशतक