बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात वादळी खेळी करुन धोनीने आपलं Best Finisher हे बिरुद पुन्हा एकदा सिद्ध केलं. ३४ चेंडून ७० धावांची खेळी करत धोनीने चेन्नईच्या विजयात मोलाचा हातभार लावला. बंगळुरुवर मात केल्यानंतर चेन्नईने गुणतालिकेत आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. या विजयाचं सेलिब्रेशन करण्याऐवजी धोनीने लगेच बापाच्या भूमिकेत शिरणं पसतं केलं.

सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी धोनीने आपली लाडकी मुलगी झिवाचे आंघोळीनंतर केस वाळवण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली. हा व्हिडीओ धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. अनेक नेटीझन्सही धोनीच्या या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

Game over, had a nice sleep now back to Daddy’s duties

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

आतापर्यंत चेन्नईने सहा सामने खेळले असून यापैकी पाच सामन्यांमध्ये चेन्नईने विजय मिळवला आहे. मोहालीत किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला एकमेव पराभव पत्करावा लागला आहे. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात रायडू आणि धोनीने शतकी भागीदारी करुन संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे आगामी सामन्यात चेन्नई आणि धोनी कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.