करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतातील आघाडीची टी २० लीग IPL चे आयोजनदेखील लांबणीवर ढकलण्यात आले आहे. या स्पर्धेत आपली चमक दाखवून टीम इंडियात कमबॅक करण्याची धोनीकडे चांगली संधी आहे, असे बोलले जात होते. याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माइक हसी याने मत व्यक्त केलं आहे.

गांगुली ओरडून ओरडून सांगत होता, पण कैफने ऐकलंच नाही… वाचा ‘तो’ किस्सा

लॉकडाउनच्या आधी संघातील सहकाही चेन्नईत होते. तेथे चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सराव सत्रासाठी सारे जमले होते. त्यावेळी एक गोष्ट दिसून आली की महेंद्रसिंग धोनी हा एकदम चांगल्या लयीत आहे. त्याचा षटकार मारण्याचा व्हीडीओही व्हायरल झाला होता. पण तरीदेखील त्याच्या निवृत्तीच्या चर्चा अद्याप सुरू आहेत. त्यावर माइक हसीने आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की महेंद्रसिंग धोनी हा अद्यापही क्रिकेट खेळण्यासाठी तंदुरूस्त आहे. पण त्याच्या डोक्यात सध्या काय विचार सुरू आहे हे फक्त धोनीच सांगू शकेल.

दुष्काळात तेरावा… ऑलिम्पिक समितीच्या सदस्यच निघाला करोना पॉझिटिव्ह

अझरूद्दीननेही काही दिवसांपूर्वी धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीबाबत मत मांडलं होतं. “धोनीला नक्की काय हवं आहे हे माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तोच सगळ्यांना सांगू शकेल. निवृत्तीचा निर्णय हा पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे. सध्याची स्थिती पाहता एक गोष्ट नक्की की करोनाचा तडाखा बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थीतीत IPL चे आयोजन होणं दूरच राहिलं. मूळ जीवनपद्धती रूळावर यायलाच वेळ लागेल… आणि धोनीबाबत म्हणाल तर त्याने काय करावं हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे”, असे अझरूद्दीन म्हणाला होता.

तेव्हा मी रात्रभर ढसाढसा रडलो – विराट कोहली

दरम्यान, विश्वचषक २०१९ संपल्यानंतर धोनी अद्याप क्रिकेटच्या मैदानावर परतलेला नाही. त्याच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत, पण त्याने मात्र स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.