News Flash

धोनीसुद्धा फुटबॉलच्या मदानावर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे फुटबॉलप्रेम सर्वश्रुत आहे. सध्या देशात १२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इंडियन सुपर लीगची (आयएसएल) रणधुमाळी जोरात सुरू आहे.

| October 7, 2014 01:41 am

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे फुटबॉलप्रेम सर्वश्रुत आहे. सध्या देशात १२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इंडियन सुपर लीगची (आयएसएल) रणधुमाळी जोरात सुरू आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यापाठोपाठ आता धोनीसुद्धा आयएसएलच्या मैदानावर अवतरला आहे. चेन्नईन एफसी संघाचा धोनी सहमालक झाला आहे. बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनसुद्धा याच संघाचा मालक आहे. ‘‘धोनीने चेन्नईन एफसी संघाचा सहमालक म्हणून करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत,’’ अशी माहिती या स्पध्रेचे संयोजक आयएमजी-रिलायन्स यांनी दिली. आयएसएल स्पर्धा १२ ऑक्टोबर ते २० डिसेंबर या कालावधीत चालणार आहे.

आयएसमधील क्रिकेटपटू मालक
क्रिकेटपटू                   संघ
सौरव गांगुली          अ‍ॅटलेटिको डी कोलकाता
सचिन तेंडुलकर      केरळा ब्लास्टर्स
विराट कोहली          एफसी गोवा    
महेंद्रसिंग धोनी        चेन्नईन एफसी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2014 1:41 am

Web Title: ms dhoni becomes co owner of isl team chennaiyin fc
टॅग : Isl,Ms Dhoni
Next Stories
1 इंग्लंडच्या ‘गुंडगिरी’ प्रवृत्तीच्या संस्कृतीला पीटरसनने फटकारले
2 जागतिक कनिष्ठ बुद्बिबळ स्पर्धा : विदित गुजराथीचा धडाकेबाज प्रारंभ
3 मी वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला असता -मेरी कोम
Just Now!
X