News Flash

धोनीचा आणखी एक विक्रम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केलेली ६५ धावांची तडाखेबंद खेळी भारताचा दारुण पराभव टाळू शकली नाही.

| December 7, 2013 02:34 am

सर्वाधिक धावा फटकावणारा भारतीय कर्णधार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केलेली ६५ धावांची तडाखेबंद खेळी भारताचा दारुण पराभव टाळू शकली नाही. मात्र याच खेळीमुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या विक्रमाच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
धोनीने १५२ एकदिवसीय सामन्यांत ५२७८ धावा करत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मागे टाकला. अझरुद्दीनने १७४ सामन्यांत ५२३९ धावा केल्या होत्या. धोनीने ५८.६४च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. अझरुद्दीनची सरासरी ३९.३९ इतकी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा टप्पा गाठणारा धोनी हा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी अझरुद्दीन आणि सौरव गांगुली (५०८२ धावा) यांनी ही किमया केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 2:34 am

Web Title: ms dhoni becomes indias highest scoring odi captain
टॅग : Dhoni,Indvssa
Next Stories
1 प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व गमावले-सचिन
2 क्लार्क, हॅडिनच्या शतकांसह ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर
3 मुंबई शहर, ठाणे बाद फेरीत
Just Now!
X