२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं. यानंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देऊन ऋषभ पंतला संधी दिली. विश्वचषकानंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाहीये. एकीकडे धोनी निवृत्ती कधी घेणार या चर्चा रोज सुरु असताना, सुरेश रैनाने धोनी हा टीम इंडियाचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक असल्याचं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – Once Upon a Time in Rajasthan : पाहा, आयपीएलच्या संघांचा फिल्मी अंदाज

तो आयपीएलच्या आगामी हंगामाच्या आधी Star Sports वाहिनीशी बोलत होता. यंदा चेन्नईच्या संघात अनेक अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा भरणा आहे, त्यामुळे संघ यंदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षाही रैनाने बोलून दाखवली.

आयपीएलच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जला अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सकडून पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे आगामी हंगामात चेन्नईचा संघ कोणती रणनिती घेऊन मैदानात उतरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : RCB चा संघ नवीन नावाने मैदानात उतरणार??