भारताचा माजी कर्णधार आणि सर्वांचा लाडका महेंद्रसिंह धोनी आज ४०वा वाढदिवस साजरा करत  आहे. या खास दिवशी धोनीला अनेकजण शुभेच्छा देत आहे. धोनीने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो आयपीएलमधून चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा सुरू होण्यास अद्याप वेळ आहे. अशा परिस्थितीत धोनी आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. त्याची पत्नी साक्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून धोनीबद्दल माहिती देत असते. साक्षीनेही धोनीबद्दल खूप मजेदार खुलासे केले आहेत.

साक्षीने एका मुलाखतीत खुलासा केला, की धोनीला व्हिडिओ गेम खेळणे खूप आवडते. रात्री झोपेतही तो पबजीबद्दल (आता बीजीएमआय) बडबडत असतो. क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध जसे डावपेच धोनी आखतो, तसेच काहीसे डावपेच तो पबजीमध्येदेखील वापरतो. पबजी या गेमचे भारतात असंख्य चाहते होते.  त्यानंतर या गेमवर भारतात बंदी घालण्यात आली. आता हा गेम बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया (बीजीएमआय) नावाने ओळखला जातो. नाव किंवा स्वरुपात बदल झाला असला, तरी सर्वांना हा गेम पबजी म्हणूनच परिचित आहे.

हेही वाचा – अरे बापरे..! भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी इंग्लंडच्या तीन क्रिकेटपटूंना करोनाची लागण!

 

 

साक्षी म्हणते, ”पबजीने थेट आमच्या बेडरुमपर्यंत शिरकाव केला आहे. माही दिवसभर एवढा पबजी खेळतो की, राञी झोपेत देखील तो पबजीबद्दलच बडबडत असतो. धोनी हेडफोन घालून एकटाच व्हिडीओ गेमवर बोलत असतो, कधी कधी वाटते, की तो आपल्यासोबत बोलतोय, परंतु तो व्हिडीओ गेमवर बोलत असतो.”

परंतु, हे सर्व खरे असले तरी क्रिकेटच्या मैदानात आल्यावर धोनी आपल्या एकाग्रतेत भंग होऊ देत नाही. पबजीची जरी त्याला आवड असली, तरी क्रिकेट हेच त्याचे पहिले प्रेम आहे. या एकाग्रतेमुळेच धोनी आपल्या संघाला विजय मिळवून देत असतो.