News Flash

IND v NZ : मैदानावर पाऊल ठेवताच धोनीच्या नावावर विक्रमाची नोंद

अशी कामगिरी करणारा धोनी पहिलाच भारतीय

न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात महेंद्रसिंह धोनीने स्वतःच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. भारताकडून 300 टी-20 सामने खेळणारा धोनी पहिला खेळाडू ठरला आहे. हॅमिल्टनच्या मैदानात खेळवण्यात आलेला तिसरा सामना हा धोनीच्या कारकिर्दीतला 300 वा सामना ठरला आहे.

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट, आयपीएल आणि झारखंड कडून खेळताना धोनीने आपल्या कारकिर्दीत 300 सामन्यांचा टप्पा पार केला आहे.

दरम्यान अखेरच्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. भारताच्या सर्व गोलंदाजांचा समाचार घेत न्यूझीलंडने 212 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यातही धोनीने यष्टींमागे आपली चमक दाखवली. धोनीने एक यष्टीचीत आणि एक झेल असे दोन बळी आपल्या खात्यात जमा केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 2:47 pm

Web Title: ms dhoni creates unique record becomes first man from indian to played 300 t20
टॅग : Ind Vs Nz,Ms Dhoni
Next Stories
1 IND v NZ : ‘या’ अनोख्या विक्रमापासून धोनी अवघी दोन पावलं दूर
2 मराठमोळ्या स्मृती मंधानाची टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळीची नोंद
3 इतिहास घडवण्याची संधी भारताने गमावली, यजमानांची मालिकेत बाजी
Just Now!
X