भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या भारतीय संघाकडून खेळत नाहीये. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-20 मालिकेसाठी धोनीची संघात निवड झाली नव्हती, आणि कसोटी क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती स्विकारली आहे. मात्र क्रिकेटचं मैदान दूर असलं तरीही माहीने आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. यावेळी धोनीने रांची येथील एका स्थानिक टेनिस स्पर्धेत भाग घेत आपल्या साथीदारासह दुहेरी फेरीचं विजेतेपद पटकावलं आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या ट्विटर हँडलवरुन धोनीच्या या अनोख्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. स्थानिक कंट्री क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या टेनिस स्पर्धेत धोनी मैदानात उतरला होता. यानंतर सोशल मीडियावरही धोनीच्या या नवीन अवताराची सध्या चर्चा सुरु आहे.

View this post on Instagram

Tennis Champion

A post shared by MS Dhoni / Mahi7781 (@msdhoni.fc) on