05 August 2020

News Flash

IPL 2018 : फक्त तीन शब्दांत आटोपली होती चेन्नईची फायनलची मिटिंग…

'वो सत्तर मिनिट ...' हा शाहरुखचा 'चख दे इंडिया'तील डायलॉग सगळ्यांना चांगलाच लक्षात असेल. अशीच एक छोटीशी टीम मिटींग चेन्नई संघाचीही झाली होती.

‘वो सत्तर मिनिट …’ हा शाहरुख खानचा चख दे इंडिया चित्रपटातील डायलॉग आपणा सगळ्यांना चांगलाच लक्षात असेल. सामना सुरु होण्याआधी टीम मिटिंगला किती महत्व असते, हे त्या चित्रपटातील त्या भाषणाने दिसून आले. अशीच एक टीम मिटिंग चेन्नईच्या संघाचीही अंतिम सामन्याआधी झाली आणि त्यामुळे धोनीच्या चेन्नईने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या विजयाबरोबर त्यांनी या स्पर्धेचे विजेतेपद तिसऱ्यांदा पटकावले. सनरायझर्स हैदराबाद संघाला चेन्नईने मोठ्या फरकाने पराभूत केले. हंगामादरम्यान त्यांच्या काही महत्वाच्या खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना विजयाचा मार्ग सोपा नव्हता, पण धोनीच्या संयमी नेतृत्वामुळे चेन्नईने सामना आणि स्पर्धा जिंकली.

या विजयाआधी त्यांची जी टीम मिटिंग झाली, त्यात अनेक गोष्टींची चर्चा झाली असेल आणि त्यातूनच हा सामना जिंकणे सोपे झाले असेल, असा सर्वसाधारणपाने अंदाज बांधला गेला. पण, प्रत्यक्षात मात्र या सामन्याआधी खूप वेळ टीम मिटिंग झालीच नाही. धोनीने या बाबत एका कार्यक्रमात स्पष्ट केले. धोनी म्हणाला की आमच्या मिटिंगसाठी प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग ड्रेसिंग रूममध्ये आले आणि त्यांनी “गो, गेट ईट!” या तीन शब्दात मिटिंग संपवली. केवळ ५ सेकंदामध्ये ही मिटिंग संपली आणि आम्ही सारे मैदानावर गेलो.

संघातील प्रत्येक खेळाडूला आपली भूमिका माहिती होती. त्यामुळे मिटींगमध्ये अधिकचे काही बोलावे, असे प्रशिक्षकांना वाटले नसेल, असेही धोनीने यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2018 12:42 pm

Web Title: ms dhoni csk ipl 2018 final team meeting stephen fleming
टॅग Csk,IPL 2018
Next Stories
1 भारतीय महिला बुद्धिबळ स्टार खेळाडूचा बुरखा घालण्यास नकार, एशियन चॅम्पिअनशिपमधून घेतली माघार
2 अनुष्काच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला हे जास्त स्पेशल: विराट
3 रवी शास्त्रींच्या हस्ते विराट कोहलीला ‘पॉली उम्रीगर पुरस्कार’
Just Now!
X