News Flash

Video: धोनीच्या झिवाचा ब्राव्होसोबत चॅम्पियन डान्स

रैनाच्या मुलीच्या बर्थ-डे पार्टीत थिरकली झिवा

महेंद्रसिंह धोनी, ड्वेन ब्राव्हो आणि झिवा (संग्रहीत छायाचित्र)

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो हा क्रिकेटसोबत, त्याच्या ‘चॅम्पियन’ या गाण्यासाठीही ओळखला जातो. मैदानात फटकेबाजी करणाऱ्या ब्राव्होच्या चॅम्पियन या गाण्याने तरुणांची पसंती मिळवली. ब्राव्होच्या या गाण्यावर महेंद्रसिंह धोनीची लाडकी मुलगी झिवादेखील थिरकली…निमीत्त होतं सुरेश रैनाच्या मुलीच्या बर्थडे पार्टीचं.

चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या ट्विटर हँडलवर झिवाच्या ब्राव्होसोबतच्या डान्सचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावेळी ब्राव्होने पार्टीत उपस्थित असलेल्या बच्चेकंपनी सोबत डान्स करत आनंद लुटला. यावेळी झिवाचा डान्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता.

तब्बल दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने, यंदा प्ले-ऑफच्या फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. आतापर्यंतच्या हंगामात ब्राव्होने १२ सामन्यांमध्ये १३३ धावा काढल्या आहेत. याचसोबत गोलंदाजीतही ब्राव्होच्या नावावर ९ बळी जमा आहेत. चेन्नईचा पुढचा सामना शुक्रवारी दिल्ली डेअरडेविल्स संघाविरुद्ध होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 4:31 pm

Web Title: ms dhoni daughter ziva dances with dwayne bravo on champions song watch video
टॅग : Csk,IPL 2018,Ms Dhoni
Next Stories
1 दुबईतील आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन्स ट्रॉफीवर ठाणेकरांचा झेंडा
2 ओ’ब्रायनचे शतक व्यर्थ; पहिल्यावहिल्या कसोटीत आयर्लंडचा पाकिस्तानकडून पाच गडी राखून पराभव
3 ‘महिला आयपीएल’साठी हरमनप्रीत आणि स्मृती मंधानाकडे कर्णधारपद
Just Now!
X