News Flash

धोनीची झिवा विचारते, रणवीरने माझा गॉगल का घातला?

धोनीने शेअर केला भन्नाट किस्सा

धोनी सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी त्याने विश्रांती घेतली आहे. नोव्हेंबरपर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार अशी चर्चा आहे. पण तो पर्यंत धोनी कुटुंबीयांना पूर्ण वेळ देत आहे. त्यामुळे तो रोज आपल्या कुटुबीयांबरोबरचे किस्से शेअर करत असतो. त्यातच धोनीने आपली मुलगी झिवा हिचा एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे.

धोनीने आपली मुलगी झिवा हिचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये झिवा आणि रणवीर सिंग या दोघांनी काहीसा सारखाच गॉगल लावला आहे. या फोटो खाली धोनीने एक छोटासा किस्सा देखील लिहिला आहे. ‘जेव्हा झिवाने रणवीरला गॉगल घातलेला पाहिले तेव्हा तिने विचारले की माझा गॉगल त्याने का घातला? त्यानंतर ती वरच्या खोलीत गेली. स्वत:चा गॉगल घेऊन आली आणि म्हणाली की माझा गॉगल तर माझ्याकडेच आहे. आजकालची मुलं खूपच हुशार आणि वेगळी आहेत. साडेचार वर्षाच्या वयातच रणवीरचा गॉगल तिच्यासारखा आहे हे तिने ओळखलं. मी त्या वयाचा असताना मला हे कळलंदेखील नसतं. मला ही देखील खात्री आहे की ती ज्यावेळी रणवीरला भेटेल तेव्हा ती नक्कीच त्याला सारख्या गॉगलबद्दल सांगेल’, असा किस्सा त्याने लिहिला.

या पोस्टवर प्रचंड कमेंट्स आल्या आहेत. तसेच सगळ्यांनी झिवाचे कौतुकदेखील केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 3:57 pm

Web Title: ms dhoni daughter ziva similar glasses ranveer singh instagram social media post vjb 91
Next Stories
1 “अजिबात निवृत्त होणार नाही, CSK कडून पुढल्या वर्षीही खेळणार”
2 IND vs SA : ‘घेणं न देणं, फुकटचं ट्रोल होणं’; राहुलची व्यथा
3 VIDEO: भारतीय नौदलामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे स्वप्न साकार करण्याची क्षमता – राजनाथ सिंह
Just Now!
X