करोना रोगाच्या तडाख्यामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. देशभरात भीतीचे वातावरण आहे. सारेच देश या रोगावर मात करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. करोनाच्या भीतीने अनेक मोठे कार्यक्रम, संमेलने रद्द करण्यात आली आहेत. क्रीडा क्षेत्रालाही याचा फटका बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. भारतातील आघाडीची टी २० लीग म्हणजेच IPL देखील २९ मार्चपासून सुरू होणार होते, मात्र करोनाच्या तडाख्यामुळे IPL १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. यामुळे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पुन्हा खेळताना पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न अद्याप तरी अपुरे आहे. तशातच BCCI च्या एका कृत्यामुळे धोनीप्रेमी अधिकच संतापले आहेत.

‘हम तुम एक कमरे में बंद हो’… पाहा हार्दिक-नताशाचा ‘लॉकडाउन’ स्पेशल फोटो

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अधिकृत ट्विटर हँडलवरून काही दिवसांपूर्वी अचानक धोनीचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. जुलै २०१९ नंतर तब्बल ८ महिन्यांनंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा फोटो BCCI ने शेअर केला होता. त्या फोटोत धोनी स्मितहास्य करताना दिसला आणि करोना व्हायरसच्या भयभीत वातावरणात छानपैकी हसत राहण्याचा संदेश या फोटोच्या माध्यमातून BCCI ने दिला.

CoronaVirus : “विराट, सचिन.. लाज वाटते की नाही..?”; नेटिझन्सचा सोशल मीडियावर संताप

त्यानंतर नुकताच BCCI ने आणखी फोटो पोस्ट केला. इन्स्टाग्रामवर १३ मिलियन फॉलोअर्स झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी एक पोस्टरचा फोटो पोस्ट करण्यात आला. या पोस्टरमध्ये आभार मानण्यासाठी भारताच्या पुरूष आणि महिला संघाचे आघाडीच्या खेळाडूंचे फोटो वापरण्यात आले. त्या पोस्टरमध्ये विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादव यांचे फोटो वापरण्यात आले. मात्र भारताला ICC च्या तीनही महत्त्वाच्या ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या धोनीचा फोटो वापरला नाही.

विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्यांसाठी सचिनचा खास संदेश, म्हणाला…

 

View this post on Instagram

 

A 13 Million strong family Thank you for your love and support

A post shared by Team India (@indiancricketteam) on

धोनीला या आघाडीच्या खेळाडूंमध्ये स्थान न दिल्याने धोनीप्रेमी चांगलेच नाराज झाले. या पोस्टरवर कमेंट करून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा एकदिवसीय विश्वचषक २०१९ नंतर क्रिकेटच्या मैदानावर अद्याप परतलेला नाही. IPL 2020 च्या माध्यमातून त्याला आपला खेळ दाखवायची संधी होती, पण करोना व्हायरसच्या फटक्यामुळे IPL चे आयोजन लांबणीवर पडले. त्यामुळे धोनीला आता आपण इतरांसारखाच खेळ करू शकतो हे दाखवून देण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.