भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी हा गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पण असे असले तरी तो आपल्या चाहत्यांच्या कायमच संपर्कात असल्याचे दिसून येत आहे. धोनीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रांचीतील लोक ‘लोकल बॉय’ असलेल्या धोनीची एक झलक पाहण्यासाठी वाट बघतात. धोनीदेखील आपल्या चाहत्यांना निराश करत नाही. चाहते धोनीच्या आसपास असले की तो बहुतांश वेळा त्यांची इच्छा पूर्ण करतो.

Video : ‘देव तारी त्याला…’; चेंडू स्टंपला लागूनही वॉर्नर नाबाद

सध्या सोशल मीडियावरील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी आपल्या चाहत्याची इच्छा पूर्ण करताना दिसतो आहे. धोनीला रस्त्यात एका चाहत्याने अडवले आणि आपल्या मोटारसायकलवर धोनीने स्वाक्षरी द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली. धोनीनेही क्षणाचा विलंब न करता मोटारसायकलच्या फ्युएल टँकवर लगेच स्वाक्षरी केली आणि चाहत्याची इच्छा पूर्ण केली.

धोनीचे बाईक प्रेम जगजाहीर आहे. विविध मोटारसायकलवर फेरफटका मारणे त्याला आवडते. त्याच्याकडे एकाहून एक चांगल्या मोटारसायकलचे कलेक्शन आहे. त्याच्या ताफ्यात जगभरातील सर्वोत्तम दुकाची आणि चारचाकी वाहनांचा भरणा आहे.

धोनीने फ्युएल टँकवर केलेली स्वाक्षरी

दरम्यान, धोनी सध्या क्रिकेटपासून दूर असल्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे आव्हान संपुष्टात आल्यापासून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीचे चाहते धोनीमध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे. त्याने इतक्यात निवृत्त होऊ नये, अशी मतं व्यक्त करत आहेत. पण धोनी मात्र विश्वचषकानंतर अद्याप क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला नाही. धोनीने विश्वचषक स्पर्धेनंतर दोन महिन्यांची विश्रांती घेतली होती.

Video : असली कसली फलंदाजी? चेंडू खेळताना गोलंदाजालाच दाखवली पाठ

धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली, त्या कालावधीत त्याने काश्मीरमध्ये जाऊन भारतीय लष्कराला सेवा दिली. त्यानंतर धोनी मैदानात परतेल असे वाटत असतानाच तो नोव्हेंबरपर्यंत विश्रांती घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे धोनी मैदानावर परतण्याऐवजी निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा पुन्हा रंगू लागली.