भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जुलै २०१९ पासून क्रिकेटपासून दूर आहे. विश्वचषकातील पराभवानंतर केवळ CSKच्या IPLआधीच्या सराव सत्रात त्याने बॅट हाती घेतली होती. पण करोनामुळे IPL लांबणीवर पडले. त्यामुळे धोनीचे पुनरागमन पुन्हा लांबणीवर पडले. आता टी-२० विश्वचषक झाल्याने IPLचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात धोनी क्रिकेटच्या मैदानावर दिसेल हे नक्की. पण धोनीचे फॅन्स त्याला खूपच मिस करत आहेत. अशातच एका लहान मुलीचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.

IPL 2020 : धोनीची झाली करोना चाचणी

हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की पहिलं नाव येतं ते धोनीचं. IPL असो किंवा भारतीय संघाकडून खेळायचं असो, धोनीने हेलिकॉप्टर शॉटच्या मदतीने अनेकदा उत्तुंग असे षटकार लगावले आहेत. पण जुलै २०१९ नंतर धोनी क्रिकेट खेळताना दिसला नसल्याने त्याचा हेलिकॉप्टर शॉटदेखील चाहत्यांनी पाहिलेला नाही. पण सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सात वर्षांची चिमुरडी हुबेहुब धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट खेळताना दिसते आहे. भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रा याने तिचा हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडिओ शेअर केला आहे. माजी खेळाडू संजय मांजरेकरने तिचं कौतुक केलं आहे.

“मी तुला पंतप्रधान बनवलं अन् आता…”; मियाँदाद-इम्रान खान यांच्यात खडाजंगी

परी शर्मा असं या चिमुरडीचं नाव आहे. हरियाणातील सात वर्षीय परी शर्मा ही तिच्या फलंदाजीच्या कौशल्यामुळे सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांकडून तिचं कौतुक केलं जात आहे.