Video : भारत आणि विंडीज यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना त्रिवेंद्रम येथे १ नोव्हेंबरला होणार आहे. चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून ऋषभ पंतला संघाबाहेर ठेवण्यात आले होते आणि यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनीला संघात स्थान मिळाले होते. पण त्याला आपली निवड सार्थ ठरवता आली नाही. त्यामुळे शेवटच्या सामन्यात त्याच्याजागी ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे.

पदार्पणाच्या काळात धोनी झंझावाती खेळ करण्यासाठी प्रसिद्ध होता. २३ डिसेंबर २००४ला त्याने वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि ३१ ऑक्टोबर २००५ ला त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ४ बाद २९८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने अप्रतिम फलंदाजी केली होती. धोनीने १४५ चेंडूत १८३ धावा केल्या होत्या आणि एकहाती सामना जिंकवून दिला होता.

Indian Cricket Team या वेरिफाईड फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला धोनीच्या चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दर्शवला आहे. दुपारी ३ पर्यंत हा व्हिडीओ १९ हजार युझर्सने पाहिल्याचे दिसले आहे.