05 June 2020

News Flash

विश्वचषकासाठी धोनी भारतीय संघात हवाच – नासिर हुसेन

दडपणाखाली कसं खेळावं हे धोनीला माहिती आहे !

महेंद्रसिंह धोनी हा आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आहे. ३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी धोनीची १५ सदस्यीय भारतीय संघात निवड झालेली आहे. मध्यंतरी धोनी ढासळलेल्या फॉर्ममुळे अनेकवेळा टीकेचा धनी बनला आहे. मात्र धोनीचा अनुभव पाहता, विश्वचषकासाठी भारतीय संघात तो असणं गरजेचं असल्याचं, इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने म्हटलं आहे. तो ‘FirstPost’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – आईच्या आठवणीने भावुक झाला जसप्रीत बुमराह

“विश्वचषकासाठी धोनीचं भारतीय संघात असणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही खेळाडू असे असतात की ते गरजेच्या वेळी खेळून तुम्हाला सामना जिंकवून देतात. धोनी अशा खेळाडूंपैकी एक आहे. आव्हानाचा पाठलाग करताना धोनी संघावरचं दडपण दूर करतो. वन-डे क्रिकेटमध्ये धोनीचा फॉर्म घसरलाय असं अनेक जण म्हणतायत, मात्र मला असं वाटत नाही.”

विश्वचषकासारख्या स्पर्धेत दडपण न घेता कसा खेळ करावा हे धोनीला चांगलं माहिती आहे. तो वन-डे क्रिकेटमधल्या सर्वोत्तम फिनीशर पैकी एक आहे. त्यामुळे भारतासाठी धोनी हा अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. नासिरने आपलं मत मांडलं. आयपीएल संपल्यानंतर भारतीय खेळाडू इंग्लंडला रवाना होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2019 4:55 pm

Web Title: ms dhoni hugely important for india at world cup says former england captain nasser hussain
टॅग Ms Dhoni
Next Stories
1 आईच्या आठवणीने भावुक झाला जसप्रीत बुमराह
2 ICC World Cup 2019: आफ्रिदीच्या संघात सचिन-धोनीला डच्चू, एकमेव भारतीय खेळाडूला पसंती
3 Exclusive : कोट्यवधींची बोली लागूनही सिद्धार्थला सतावतेय हुंदळेवाडीतल्या कबड्डीची चिंता
Just Now!
X