24 November 2020

News Flash

“धोनी हा तर क्रिकेटमधला योगी”

माजी क्रिकेटपटूने मुलाखतील व्यक्त केलं मत

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय संघाला टी-२० विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकवून देणारा यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख संपूर्ण जगाला आहे. धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर श्रीलंकेवर मात करत विश्वचषक जिंकला. महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. त्याबद्दल बोलताना भारताचा माजी क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ याने एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

IPL 2020: रैना प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’; CSKच्या मालकांनी व्यक्त केलं रोखठोक मत

“महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटमधील योगी आहे. त्याची खेळाची समज ही अप्रतिम आहे. तो निकालाची चिंता न करता खेळ समजून घेतो. निरपेक्ष भावनेने तो खेळ खेळताना दिसतो. प्रत्येक विजयानंतर त्याची बोलण्याची पद्धत त्यांच्यातील साधेपणा अधोरेखित करते. त्याच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या स्पर्धांच्या ट्रॉफीसुद्धा तो इतर खेळाडूंच्या स्वाधीन करतो आणि स्वतः शांतपणे अलिप्त राहताना दिसतो”, असे श्रीनाथ अश्विन सोबत लाईव्ह चॅट दरम्यान बोलताना म्हणाला.

रैनाच्या जागी खेळणार ‘हा’ मराठमोळा फलंदाज; CSKच्या मालकांनी दिले संकेत

खेळपट्टीवर घडत असलेल्या बाबी आपल्या संघासाठी पोषक नसतील किंवा आपला संघ संकटात असेल तर तो प्रकारे दडपण हाताळतो, तसं एखादा योगीच करू शकतो. अशा दाबावाच्या स्थितीतही तो खूप शांत आणि संयमी असतो हे त्याचे बलस्थान आहे”, असेही श्रीनाथने सांगितलं.

“मैदानाबाहेर आल्यानंतर तुम्ही जितक्या लवकर खेळापासून स्वत:ला दूर ठेवू शकता, तेवढं तुमच्यासाठी ते चांगलं आणि फायद्याचं असतं. धोनी या बाबतीत सर्वोत्तम आहे आणि म्हणूनच आम्हाला त्याच्याबद्दल नितांत आदर आहे”, असं त्याने नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 11:15 am

Web Title: ms dhoni is like yogi in cricket says javagal srinath vjb 91
Next Stories
1 “IPL खेळतोस, PSL ला नकार का?; पाकिस्तानी चाहत्याला क्रिकेटपटूचं सडेतोड उत्तर
2 मोठी बातमी…. धोनीनंतर विराटला धक्का, स्टार गोलंदाज आयपीएलमधून बाहेर
3 चॅम्पियन्स लीग फुटबॉल : लिआँ संघाचे पंचक
Just Now!
X