04 June 2020

News Flash

World Cup 2019 : मैदानावर पाऊल ठेवताच धोनीचा विक्रम, सचिनच्या पंगतीत मिळवलं स्थान

न्यूझीलंडविरुद्ध भारताची आश्वासक खेळी

भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी २०१९ विश्वचषक स्पर्धेत, न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात अनोख्या विक्रमाचा मानकरी ठरला आहे. महेंद्रसिंह धोनीचा भारताकडून हा ३५० वा सामना ठरला आहे. भारताकडून अशी कामगिरी करणारा धोनी दुसरा खेळाडू ठरला आहे. अशी कामगिरी करुन धोनीने सचिन तेंडुलकर व अन्य दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : बुमराहचा मारा ठरतोय प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी

सचिन तेंडुलकरने आतापर्यंत वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा म्हणजेच ४६३ वेळा भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यानंतर या यादीमध्ये महेला जयवर्धने, सनथ जयसूर्या आणि कुमार संगकारा यांचा नंबर लागतो. या तिन्ही खेळाडूंनी श्रीलंकेसाठी अनुक्रमे ४४८, ४४५ आणि ४०४ सामने खेळले आहेत. याशिवाय शाहीद आफ्रिदी, रिकी पाँटींग, इंझमाम उल-हक, वासिम अक्रम हे खेळाडूदेखील यादीमध्ये धोनीच्या पुढे आहेत.

अवश्य वाचा – World Cup 2019 : नकोशा विक्रमात न्यूझीलंडने भारताला टाकलं मागे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2019 5:55 pm

Web Title: ms dhoni joins sachin tendulkar in elite list without a single ball being bowled in india vs new zealand semis psd 91
Next Stories
1 World Cup 2019 – मँचेस्टरमध्ये संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता ९० टक्के
2 ‘कोहिनूर घ्या, बुमराह द्या!’; भारताच्या भन्नाट गोलंदाजीला नेटकऱ्यांचा मिम्सच्या माध्यमातून सलाम
3 World Cup 2019 : नकोशा विक्रमात न्यूझीलंडने भारताला टाकलं मागे
Just Now!
X