25 October 2020

News Flash

धोनीचं भारतीय संघात पुनरागमन आता जवळपास अशक्यच – सुनिल गावसकर

तो लवकरच निवृत्तीचा निर्णय जाहीर करेल !

देशात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महत्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने १५ एप्रलिपर्यंत पुढे ढकलली आहे. आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून भारतीय संघात महेंद्रसिंह धोनीचं पुनरागमन होणार का, हा प्रश्न गेले अनेक महिने क्रिकेट प्रेमींच्या मनात आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम हा धोनीसाठी अत्यंत महत्वाचा होता. मात्र भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांच्या मते धोनीचं भारतीय संघात पुनरागमन आता जवळपास अशक्य आहे. ते दैनिक जागरण वृत्तपत्राशी बोलत होते.

“धोनीला विश्वचषकात खेळताना पहायला मलाही आवडेल, परंतु सध्याच्या घडीला ते अशक्य दिसत आहे. धोनीला सोडून भारतीय संघ आता पुढे गेला आहे. माझ्या मते धोनी कोणत्याही पद्धतीने मोठी घोषणा किंवा कार्यक्रम आयोजित करुन निवृत्ती घोषित करणार नाही. एक दिवस तो शांततेत आपला निर्णय जाहीर करेल.” सुनिल गावसकरांनी आपलं मत मांडलं. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं होतं. यानंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

धोनीनंतर निवड समितीने ऋषभ पंतला संधी दिली. मात्र पंतला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. नवीन वर्षात भारतीय संघाने वन-डे, टी-२० क्रिकेटमध्ये लोकेश राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी आयपीएलमध्ये चांगला खेळ करणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. परंतु सध्या करोनामुळे आयपीएलच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे धोनी भारतीय संघात पुनरागमन करणार की नाही हा प्रश्न अजुनही कायम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2020 10:16 am

Web Title: ms dhoni likely to silently retire not someone to make big announcements says sunil gavaskar psd 91
टॅग Ms Dhoni
Next Stories
1 इंग्लिश फुटबॉल क्लब्सना भविष्याची चिंता!
2 सुरक्षित वातावरणात भारतीय हॉकी संघांचा सराव सुरू
3 लुइस हॅमिल्टनचे स्वयंअलगीकरण
Just Now!
X