News Flash

काश्मिरी खेळाडूंसाठी धोनी सरसावला, क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या तयारीत

धोनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशी चर्चा करणार

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी, जम्मू-काश्मीरमधील खेळाडूंसाठी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या तयारीत आहे. काश्मीरमधल्या तरुण खेळाडूंना धोनीच्या अकादमीत मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी यासंदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशीही चर्चा करणार असल्याचं समजतंय. धोनीने सध्या २ महिने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून तो भारतीय सैन्यदलाच्या 106 TA Battalion (Para) तुकडीत काम करतो आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं ३७० कलम केंद्रीय गृहमंत्रालयाने काढून टाकल्यानंतर, सध्या काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे काश्मिरी जनतेच्या उज्वल भविष्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवण्याच्या तयारीत आहे. काश्मीरमधल्या उभरत्या आणि तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी धोनीने आपल्या खांद्यावर घेतल्याचं समजतंय. आगामी काळात धोनी आपल्या या योजनेबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला माहिती देणार आहे. Times Now या इंग्रजी संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

धोनी सध्या दक्षिण काश्मीर परिसरात आपल्या सैन्यदलातल्या तुकडीसोबत गस्त घालण्याचं काम करतोय. विश्वचषक संपल्यानंतर धोनीवर निवृत्तीचा दबाव वाढत होता, मात्र धोनीने अद्याप अधिकृतरित्या आपल्या निवृत्तीची घोषणा केली नाहीये. त्यामुळे भविष्यकाळात केंद्रीय क्रीडा मंत्रालय धोनीच्या या योजनेला पाठींबा दर्शवतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 9:58 pm

Web Title: ms dhoni planning to open cricket academy in jammu and kashmir to train young talent psd 91
टॅग : Article 370,Ms Dhoni
Next Stories
1 Ind vs WI : रोहित-विराटची जोडी ठरतेय सर्वोत्तम, जाणून घ्या ही आकडेवारी
2 वन-डे संघात स्थान मिळवण्याबाबत अजिंक्य रहाणे म्हणतो….
3 जे कोणालाही जमलं नाही ते गेलने करुन दाखवलं ! भारताविरुद्ध सामन्यात विक्रमाची नोंद
Just Now!
X