News Flash

Video : ‘गली क्रिकेट’ ते ‘ट्रायल बॉल’, महेंद्रसिंह धोनी रमला बालपणीच्या आठवणींमध्ये

इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला फोटो

एकीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. मात्र दुसरीकडे धोनी आपल्या सहकाऱ्यांसोबत गली क्रिकेट चा आनंद घेतो आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही महिन्यांसाठी विश्रांती घेतलेला धोनी सध्या आपला परिवार आणि मित्रांसोबत वेळ घालवतो आहे. आपल्या मित्रांसोबत गली क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

धोनीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचा मित्र पहिल्याच चेंडूवर बोल्ड झालेला दिसतो आहे. मात्र बाद झाल्यानंतरही धोनीच्या या मित्राने लाईट कमी असल्यामुळे चेंडू दिसला नाही आणि पहिला बॉल ट्रायल बॉल असतो असं म्हणत पुन्हा एकदा फलंदाजीची संधी मिळवली. हा व्हिडीओ पोस्ट करताना धोनीने, शाळेतल्या सर्व जुन्या आठवणी परत जाग्या झाल्याचं म्हटलं आहे.

२०१९ विश्वचषकानंतर भारतीय संघात ऋषभ पंतला पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक म्हणून पसंती देण्यात आली. धोनीवर निवृत्तीचा दबाव वाढत असतानाच आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून विराट आणि संघ व्यवस्थापनाने विनंती केल्यामुळे धोनीने आपल्या निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 9:44 pm

Web Title: ms dhoni reminisces about trial ball in gully cricket watch video psd 91
टॅग : Ms Dhoni
Next Stories
1 जाणून घ्या महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघात स्थान न मिळण्यामागचं खरं कारण…
2 भारतीय संघात रोहित शर्मा घेणार धोनीची जागा
3 कुस्तीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा द्या – बजरंग पुनिया
Just Now!
X