भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय संघाच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. गेल्या वर्षभरापासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी धोनी चेन्नईत दाखल झाला आहे. १५ ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य दिनी संध्याकाळी धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. धोनीच्या निवृत्तीची बातमी समजल्यानंतर सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी…त्याच्या आतापर्यंतच्या योगदानाबद्दल त्याचे आभार मानले आहेत.

पाहूयात काही निवडक प्रतिक्रीया…

Tigress hunt crocodile with her cubs in rajasthan
राजस्थानच्या रणथंबोर उद्यानात शिकारीचा थरार; वाघीण आणि मगरीतील ‘चित्तथरारक लढाई’ VIDEO व्हायरल
Organizing an international conference on Dr Babasaheb Ambedkar in london
लंडनमध्ये आज आंतरराष्ट्रीय परिषद; शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. आंबेडकर
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल
Sealed by an international organization on the name Chandrayaan 3 landing site Shiva Shakti
‘शिवशक्ती’ नावावर आंतरराष्ट्रीय संघटनेचे शिक्कामोर्तब

१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये रंगणाऱ्या आयपीएल स्पर्धेत धोनी सहभागी होणार आहे.