06 July 2020

News Flash

….म्हणून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत युवराजआधी फलंदाजीला आलो – धोनी

धोनीच्या विजयी षटकाराने भारत विश्वविजेता

संग्रहीत छायाचित्र

2011 साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर विश्वचषकाचं विजेतेपद पटावत भारतीय संघाने इतिहासाची नोंद केली होती. महेंद्रसिंह धोनीचं कर्णधार म्हणून ते दुसरं मोठं विजेतेपद होतं. श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात धोनीने युवराजला मागे ठेऊन पहिले फलंदाजीसाठी येत सर्वांना धक्का दिला होता. मात्र गुरुवारी एका खासगी कार्यक्रमात बोलत असताना धोनीने आपल्या त्या कृतीमागचं खरं कारण सांगितलं आहे.

अवश्य वाचा – धोनीला निवृत्त हो म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही – शाहीद आफ्रिदी

“श्रीलंकेच्या बहुतांश गोलंदाजांना मी ओळखत होतो, कारण आयपीएलमध्ये ते चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळत होते. मुरलीधरन गोलंदाजी करत होता म्हणून मी युवराजला मागे ठेऊन पहिले फलंदाजीसाठी जाणं पसंत केलं. मी चेन्नईकडून खेळत असताना नेट्समध्ये मुरलीधरनच्या गोलंदाजीवर सराव केला आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध मी सहज धावा काढू शकेन हा मला आत्मविश्वास होता. याच कारणासाठी मी युवराजआधी फलंदाजीसाठी उतरलो.”

या कार्यक्रमात बोलत असताना, धोनीने आपल्या कर्णधारपदाच्या अनेक आठवणी सांगितल्या. मी कर्णधार होण्याआधी भारतीय संघात यष्टीरक्षक कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्यास उत्सुक नसायचे. त्यांच्यामते कर्णधारपद हे यष्टीरक्षकाच्या कामातलं ओझं होतं. पण मी हा दृष्टीकोन बदलून दाखवला. यष्टीरक्षणाची जागा ही कोणत्याही कर्णधाराला मदत करण्याची उत्तम जागा आहे. फलंदाजांच्या सर्व घडामोडी त्याला लवकत दिसतात व त्यानुसार तो सामन्यात हवेतसे बदल करु शकतो. धोनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होता. 2011 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीनेच विजयी षटकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2018 7:21 pm

Web Title: ms dhoni reveals why he promoted himself in icc world cup 2011 final ahead of yuvraj singh
Next Stories
1 World Boxing Championship : सोनियाची ‘चंदेरी’ कामगिरी, जर्मनीच्या ओर्नेला वानरला सुवर्णपदक
2 World Boxing Championship : ‘सुपरमॉम’ मेरी कोमचं विक्रमी विजेतेपद
3 क्रिकेटच्या सामन्यातील वादाचं पर्यवसन गोळीबारात, 7 जणांचा मृत्यू
Just Now!
X