News Flash

जेस्सी गिलने मानले धोनीचे आभार, कारण…

धोनीसोबतचा 'तो' किस्सा केला सोशल मीडियावर केला शेअर

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं. आगामी टी २० विश्वचषक आणि धोनीचं वाढतं वय लक्षात घेता त्याच्या संघातील पुनरागमनाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. मात्र आगामी वर्षात धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो असे सांगण्यात येत आहे. या दरम्यान सुप्रसिद्ध गायक जेस्सी गिल याने धोनीचे आभार मानल्यामुळे तो चर्चेत आहे.

गायक जेस्सी गिल याने काही दिवसांपूर्वी ३१ व्या वर्षात पदार्पण केले. त्याचा यंदाचा वाढदिवस खास ठरला. कारण त्याच्या या वाढदिवशी चक्क धोनी पती-पत्नीने त्याचा वाढदिवस साजरा केला. महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी धोनी यांनी या पार्टीचे यजमानपद भुषवले. त्यांच्या घरी जेस्सी गिल याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

वाढदिवस साजरा झाल्यानंतर जेस्सी गिलने त्या पार्टीचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले. त्यात त्याने धोनी आणि साक्षीचे ‘अविस्मरणीय’ वाढदिवसासाठी आभार मानले.

दरम्यान, २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर धोनीने २ महिन्याची विश्रांती घेतली. भारतीय संघ विंडिज दौऱ्यावर असताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दौऱ्यातून माघार घेतली होती. त्या काळात तो भारतीय जवानांसोबत काश्मीर खोऱ्यात गस्त घालत होता. त्याने काश्मीर खोऱ्यातील १०६ TA बटालियन (पॅरा) सोबत भारतीय सैन्यात सेवा दिली आणि सुमारे २ महिन्यांनंतर तो स्वगृही परतला. त्यानंतर धोनी मैदानावर परतणार असे वाटत असतानाच तो आणखी विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 3:57 pm

Web Title: ms dhoni sakshi host an unforgettable trip for singer jassie gill vjb 91
Next Stories
1 ICC Test Ranking : विराट कोहलीचा स्मिथला झटका, क्रमवारीत रहाणेला फटका
2 World Cup 2019 च्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडला ‘स्पिरीट ऑफ क्रिकेट’ पुरस्कार
3 हॅरिस शील्ड क्रिकेट स्पर्धा : रिझवी शाळेचे आव्हान संपुष्टात
Just Now!
X