करोना विषाणूने सध्या जगभरात दहशत निर्माण केली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू, त्यांचे सहकारी, संघ व्यवस्थापन आणि क्रिकेट बोर्डाचे सदस्य साऱ्यांनाच घरी बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. IPL च्या माध्यमातून क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करण्याचा धोनीचा प्लॅन होता असं बोललं जातं, पण IPL चे आयोजनदेखील आता लांबणीवर पडले आहे. अशा वेळी धोनी ऑनलाइन माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आला.

“कोणीही धोनीच्या रूममध्ये जावं, काहीही खायला मागवावं आणि…”; नेहराने सांगितला धमाल अनुभव

धोनीने एका ऑनलाइन कार्यक्रमात सहभाग घेतला आणि आपली मौल्यवान मते मांडली. “भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूची मानसिक शक्ती थोडीशी कमी पडते हे सत्य अजूनपर्यंत खूप लोकांना मान्य नाही. आपण खेळाडूंच्या त्या आजाराला सरसकट मानसिक ताण ठरवतो. अनेकदा फलंदाज खेळपट्टीवर जातो, तेव्हा पहिल्या पाच ते १० चेंडूंचा सामना करताना तो थोडासा घाबरलेला असतो. त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने पडत असतात. कोणीच हे उघडउघड मान्य करत नाही, पण सगळ्यांनाच तसं वाटत असतं. अशा परिस्थितीत काय करावं? खरं तर ही खूप छोटी समस्या आहे, पण काही खेळाडू प्रशिक्षकाला हे सांगायलाही घाबरतात. कोणत्याही खेळात खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यात चांगलं नातं आवश्यक असतं”, असं धोनी ‘एम्फोर’च्या कार्यक्रमात म्हणाला.

“विराट सर्वोत्तम वाटणाऱ्यांनी बाबर आझमची फलंदाजी बघा”

एम्फोर ही संस्था माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथ याने सरवना कुमार यांच्या भागीदारीने सुरू केली आहे. या संस्थेमार्फत खेळाडूंच्या मानसिक क्षेत्रातील समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने विविध दिग्गजांकडून मार्गदर्शन केले जाते.

जाडेजाची खिल्ली उडवणाऱ्या जॉन्टी ऱ्होड्सला फॅनने केलं होतं गप्प

धोनीने आपले मत मांडताना, खेळाडूंचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी त्या विभागातील तज्ज्ञ प्रशिक्षकाची (mental conditioning coach) गरज असल्याचे अधोरेखित केले. “अशा प्रकारचे तज्ज्ञ प्रशिक्षक जर केवळ १५ दिवसांसाठी संघासोबत राहिले, तर त्या १५ दिवसात ते केवळ स्वतःच्या अनुभवावरून मार्गदर्शन करू शकतात. पण जर त्यांना कायम संघासोबत ठेवलं, तर त्यांना खेळाडूंचा नीट अंदाज येईल आणि त्यांचा मार्गदर्शन करण्याचा अंदाज खेळाडूंच्या गरजेनुसार बदलेल” असेही धोनीने स्पष्ट केले.