X
X

धोनीच्या निवृत्तीवरुन संभ्रम कायम, मात्र आगामी आयपीएल खेळणार

चेन्नई संघातल्या अधिकाऱ्याची माहिती

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारणार का याबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. धोनीने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. मात्र आगामी आयपीएल हंगामात धोनी चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणार असल्याचं समजतंय. चेन्नई सुपरकिंग्जमधील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

धोनी आगामी काही दिवसांत निवृत्तीची घोषणा करेल, मात्र पुढचा आयपीएलचा हंगाम धोनी चेन्नईकडून नक्की खेळेल. संघाच्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. Times Now या इंग्रजी संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. २०१९ साली पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई संघाला अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

अवश्य वाचा – आयपीएलच्या कक्षा रुंदावणार?? अदानी-टाटा उद्योग समुह नवीन संघ विकत घेण्याच्या तयारीत

विश्वचषक स्पर्धेत धोनीला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. साखळी फेरीत धोनीला आपल्या संथ खेळीमुळे टीकेचं धनी व्हायला लागलं होतं. उपांत्य सामन्यातही धोनीने अर्धशतकी खेळी केली, मात्र भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला होता.

24
  • Tags: csk, ipl, ms-dhoni,
  • Just Now!
    X