22 March 2018

News Flash

Video: धोनी रमला कुटुंबासोबत!

लाडक्या लेकीचे फोटो केले शेअर

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 13, 2018 7:55 PM

श्रीलेंकेमध्ये सुरू असलेल्या टी- २० आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिकेत महेंद्रसिंग धोनीने ब्रेक घेतला आहे. सध्या तो आपला संपूर्ण वेळ कुटुंबासोबत घालवत आहे. धोनीने मंगळवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये माही पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत निवांत क्षण घालवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या पाळीव कुत्र्यांची आणि घराची झलकही पाहायला मिळते. एका मिनिटांच्या या व्हिडिओला धोनीने ‘कुटुंबासह थोडा निवांत वेळ’ असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओची सुरूवात झिवाच्या फोटोने होते. यानंतर व्हिडिओतील प्रत्येक फोटोत धोनीचे घर पत्नी साक्षी त्याचे चार कुत्रे दिसत जातात. यात तो कुत्र्यांसोबत खेळतानाही दिसत आहे.

Fun time with the family

A post shared by @ mahi7781 on

धोनी या श्रीलंका टूरमध्ये नसला तरी तो लवकरच आयपीएल २०१८ मध्ये दिसणार आहे. यावेळी धोनी त्याची जुनी टीम चेन्नई सुपर किंग्जकडूनच खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टूरमध्ये धोनी एकदिवसीय सामने आणि टी-२० सामन्यात सहभागी झाला होता. भारताने ही ६ सामन्यांची एकदिवसीय मालिका ५-१ ने जिंकली तर टी-२० मालिका २-१ ने खिशात घातली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झिवाचे धुलवड खेळतानाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिच्या चेहऱ्यावर निरागस हास्य असून, तिनेसुद्धा रंगांची उधळण केल्याचं पाहायला मिळालं. लहान मुलं सहसा खेळताना चेहऱ्यावर रंग लावून खेतात तेव्हा त्यांना आईचा ओरडा मिळतो. पण, इथे निमित्तच रंगाच्या सणाचं असल्यामुळे झिवाही त्याचा भाग झाली. या फोटोला अनेकांनी लाइक करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही केला.

Happy Holi !!!

A post shared by ZIVA SINGH DHONI (@zivasinghdhoni006) on

महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून ती अनेकदा झिवाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे सेलिब्रिटी बाबाची ही लेकसुद्धा एक प्रकारची सेलिब्रिटीच झालीये असं म्हणायला हरकत नाही.

First Published on March 13, 2018 7:55 pm

Web Title: ms dhoni shares video of his time with wife sakshi daughter ziva
  1. No Comments.