News Flash

धोनीने निवृत्तीचा निर्णय मैदानावर घ्यायला हवा होता : इंझमाम उल-हक

१५ ऑगस्टला धोनीने जाहीर केला निवृत्तीचा निर्णय

गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या चर्चेला अखेरीस पूर्णविराम मिळाला आहे. १५ ऑगस्टला संध्याकाळी सात वाजल्यानंतर धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत सात वाजून २९ मिनीटांनी मी निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. धोनीच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. परंतू पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल-हक धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल खुश नाहीये. इंझमामच्या मते धोनीने निवृत्तीचा निर्णय घरी बसून घेण्याऐवजी मैदानात घ्यायला हवा होता.

“जगभरात धोनीचे अनेक चाहते आहेत. त्यांना धोनीला अखेरचं मैदानाच पाहण्याची इच्छा असणार. माझ्यामते धोनीसारख्या खेळाडूने घरी बसून निवृत्तीचा निर्णय घेणं योग्य नाही. त्याने मैदानात आपला निवृत्तीचा निर्णय घ्यायला हवा होता. सचिन तेंडुलकरनेही जिथून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली तिकडेच निवृत्ती स्विकारली. ज्यावेळी तुम्हाला क्रिकेटमध्ये मानाचं स्थान मिळतं, जगभरात तुमचे कोट्यवधी चाहते असतात अशा खेळाडूंनी मैदानातचं निवृत्ती जाहीर करायला हवी. कारण त्याच मैदानातून तुमची सुरुवात झालेली असते. माझ्या दृष्टीकोनातून धोनी भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने मैदानात निवृत्ती स्विकारायला हवी होती.” एका यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत इंझमाम बोलत होता.

अवश्य वाचा – प्रसारमाध्यमांधून होणाऱ्या टीकेमुळे धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतला असेल !

धोनी सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी करतो आहे. चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या खेळाडूंसाठी १५ ते २० ऑगस्टदरम्यान चेन्नईत एम.ए.चिदंबरम मैदानात ट्रेनिंग कँपचं आयोजन केलं आहे. धोनीसह रैना, केदार जाधव, पियुष चावला, कर्ण शर्मा असे अनेक खेळाडू या कँपमध्ये सहभागी झालेत. २० ऑगस्टनंतर चेन्नईचे खेळाडू युएईला रवाना होतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली असली तरीही धोनी पुढचे काही हंगाम आयपीएल खेळत राहणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलच्या स्पर्धेचं आयोजन युएईमध्ये करण्यात आलंय.

अवश्य वाचा – २०११ विश्वचषक विजयानंतरही धोनीच्या कर्णधारपदावर होतं गंडांतर, ‘या’ माणसाने केली थेट मध्यस्थी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 4:38 pm

Web Title: ms dhoni shouldnt have taken retirement while sitting at home says inzamam ul haq psd 91
Next Stories
1 IPL 2020 : मुंबईच्या ‘हिटमॅन’चा जोरदार सराव, पाहा VIDEO
2 प्रसारमाध्यमांधून होणाऱ्या टीकेमुळे धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतला असेल !
3 लॉकडाउन नंतर भारतात पहिल्यांदा स्पर्धेचं आयोजन, ISL च्या यजमानपदाचा मान गोव्याला
Just Now!
X