15 October 2019

News Flash

Video : ऑस्ट्रेलियातही धोनीचाच बोलबाला! सराव करणाऱ्या धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

धोनीनेदेखील सरावानंतर चाहत्यांसोबत वेळ घालवला आणि चाहत्यांना खुश केले.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे चाहते सर्वदूर पसरले आहेत. ज्या देशात धोनी आणि टीम इंडिया खेळत असते, तेथे प्रत्येक ठिकाणी धोनीचे चाहते असतात. ऑस्ट्रेलियातदेखील धोनीला तसाच अनुभव आला. सराव करणाऱ्या धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. धोनीनेदेखील सरावानंतर चाहत्यांसोबत वेळ घालवला आणि साऱ्यांना खुश केले.

भारतीय संघ १२ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना सिडनीच्या मैदानावर शनिवारी रंगणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या संघात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे पुनरागमन झाले आहे. या सामन्याच्या तयारीसाठी धोनी आणि इतर सहकाऱ्यांनी सिडनीच्या मैदानावर सराव केला. त्यावेळी धोनीने आपल्या चाहत्यांना खुश केले.

कसोटी मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. त्यातील शेवटचा सामना सिडनीवर खेळण्यात आला होता. पण धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने तो या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियात नव्हता. पण एकदिवसीय सामन्यासाठी तो जेव्हा सिडनीच्या मैदानात सरावाला आला, तेव्हा धोनीच्या चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. धोनीनेदेखील सरावानंतर अपल्या चाहत्यांची भेट घेतली. त्यांना सह्या दिल्या आणि त्यांच्याबरोबर सेल्फीदेखील काढले.

धोनीच्या या प्रेमळ वतर्णुकीमुळे हजर राहिलेले सगळे चाहते एकदम खुश झाले.

First Published on January 11, 2019 3:03 pm

Web Title: ms dhoni signed a few autographs for the fans who had gathered to watch him