News Flash

Video : ‘धोनी गायी गाणे…..’; पहा माहीचा ‘सुपर-कूल’ अंदाज

धोनीचा गाणं गातानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी मागच्या काही काळापासून दूर आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं. आगामी टी २० विश्वचषक आणि धोनीचं वाढतं वय लक्षात घेता त्याच्या संघातील पुनरागमनाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. त्यातच सध्या धोनीचा एक नवा अंदाज त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

“बुमराह ‘बच्चा’ आहे, त्याची गोलंदाजी मी सहज ठोकून काढली असती…”

नुकतीच धोनी आणि त्याची पत्नी साक्षीने त्यांच्या काही जवळच्या मित्रमंडळींना स्पेशल पार्टी दिली. गायक जेस्सी गिल याने काही दिवसांपूर्वी ३१ व्या वर्षात पदार्पण केले. त्याचा यंदाचा वाढदिवस खास ठरला. कारण त्याच्या या वाढदिवशी चक्क धोनी पती-पत्नीने त्याचा वाढदिवस साजरा केला. महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी धोनी यांनी या पार्टीचे यजमानपद भुषवले. या पार्टीचे काही ‘इनसाइड’ फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

IPL 2020 : “आधी सामने जिंकायला शिका”; नेटिझन्सकडून RCB ट्रोल

त्या पार्टीमध्ये धोनी त्याच्या मित्रांसोबत मजा करताना दिसतो आहे. या पार्टीतील एका व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. धोनी त्या व्हिडीओमध्ये गाणं गाताना दिसतो आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये धोनी हातात माइक घेऊन ‘जब कोई बात बिगड जाए’ हे गाणं गात आहे.

महेंद्रसिंग धोनी सुराला पक्का नसला तरी त्याचा आवाज गाण्यासाठी चांगला आहे हे त्याच्या गाण्यावरून दिसून येते आहे. धोनीचा हा अनोखा अंदाज त्याच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीत उतरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 6:28 pm

Web Title: ms dhoni singing video goes viral on instagram social media fans are happy watch video vjb 91
Next Stories
1 “बुमराह ‘बच्चा’ आहे, त्याची गोलंदाजी मी सहज ठोकून काढली असती…”
2 IPL 2020 : “आधी सामने जिंकायला शिका”; नेटिझन्सकडून RCB ट्रोल
3 जेस्सी गिलने मानले धोनीचे आभार, कारण…
Just Now!
X