04 December 2020

News Flash

धोनीमध्ये अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक!

‘बीसीसीआय’चे माजी खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांचे मत

‘बीसीसीआय’चे माजी खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांचे मत

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीमध्ये अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक असून त्याला भारतीय क्रिकेटसाठी अधिक योगदान द्यायचे आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी व्यक्त केली.

जुलै महिन्यात धोनी चाळिशीत पदार्पण करणार असून गतवर्षी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने पराभव पत्करल्यापासून तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तसेच सध्या करोनामुळे क्रिकेटचे भवितव्य अधांतरी असल्याने धोनीच्या निवृत्तीविषयक चर्चानाही उधाण आले आहे; परंतु चौधरी यांना मात्र धोनीने इतक्या लगेच निवृत्त होऊ नये, असे वाटते.

‘‘धोनी हा शारीरिकदृष्टय़ा अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्याच्यासारखा यष्टिरक्षक भारताला अद्यापही गवसलेला नाही. मुख्य म्हणजे धोनीची कामगिरी इतकीही सुमार झालेली नाही की त्याने निवृत्ती पत्करावी. त्यामुळे किमान ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा तो नक्कीच खेळू शकतो. त्याच्यात बरेच क्रिकेट शिल्लक असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळवण्यात आल्यास त्यामध्ये तो हमखास छाप पाडेल,’’ असे चौधरी म्हणाले.

‘‘त्याचप्रमाणे ‘आयपीएल’चे आयोजन करताना ‘बीसीसीआय’ने देशातील स्थानिक तसेच विदेशातील क्रिकेटपटूंचाही विचार करावा. फक्त भारतीय संघातील खेळाडूंचा विचार करून ‘आयपीएल’ खेळवल्यास चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो. तसेच यामुळे आर्थिक नुकसानाची भरपाईसुद्धा फारशी कराता येणार  नाही,’’ याकडेही चौधरी यांनी ‘बीसीसीआय’चे लक्ष वेधले आहे.

विदेशी खेळाडूंविना ‘आयपीएल’ अशक्य -वाडिया

नवी दिल्ली : विदेशी खेळाडूंविना ‘आयपीएल’ खेळवणे अशक्य असून असे झाल्यास चाहते ‘आयपीएल’कडे पाठ फिरवतील, असे मत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी व्यक्त केले. ‘‘निश्चितच ‘आयपीएल’च्या आयोजनाबाबत मी आशावादी आहे; परंतु सुरक्षेच्या कारणास्तव फक्त भारतीय खेळाडूंसह ‘आयपीएल’ खेळवणे चुकीचे ठरेल. विदेशी खेळाडूंच्या समावेशामुळे ‘आयपीएल’चे सामने जगभरात पाहिले जातात. त्यामुळे जर विदेशी क्रिकेट मंडळे त्यांच्या खेळाडूंना ‘आयपीएल’ खेळायला पाठवण्यास तयार असतील, तर ‘बीसीसीआय’ने त्या खेळाडूंचा नक्की समावेश करावा. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, श्रीलंका या देशांतील खेळाडू ‘आयपीएल’ खेळण्यासाठी नेहमी उत्सुक असतात,’’ असे वाडिया म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 3:09 am

Web Title: ms dhoni still has much to offer says bcci treasurer zws 70
Next Stories
1 डाव मांडियेला : अमेरिकेच्या आकाशवाणीवरील ब्रिज
2 ला-लीगा फुटबॉल ११ जूनपासून
3 BCCI कडून खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस
Just Now!
X