News Flash

चाहत्यासाठी काहीपण! गाडी थांबवून धोनीने घेतली छोट्या फॅनची भेट

धोनीने निघताना त्या फॅनला हातही मिळवला

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी२० संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे धोनी मधल्या कालावधीत जाहिरातींचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे. नुकताच तो प्रो-कबड्डीच्या मैदानात दिसला. तेव्हा तो चांगलाच चर्चेचा विषय ठरला. पण आता धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्या व्हिडीओमुळे तो चर्चेत येत आहे. या व्हिडिओमध्ये तो आपली गाडी थांबवून एका चिमुरड्या चाहत्याची भेट घेताना दिसत आहे आणि त्याच्याशी संवाद साधताना दिसत आहे.

हा पाहा व्हीडीओ –

एका युझरने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हीडीओ एका विमानतळाबाहेरचा असल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे. या व्हीडीओमध्ये धोनी आपल्या गाडीमध्ये बसला असताना एक छोटा फॅन त्याला भेटायला आला. त्यावेळी धोनीने प्रोटोकॉलची चिंता न करत त्या फॅनची भेट घेतली आणि संवाद साधला. इतकेच नव्हे तर धोनीने निघताना त्या फॅनला हातही मिळवला.

दरम्यान, माजी कर्णधार एम.एस. धोनीला टी-२० मालिकेतून वगळण्यात माझा हात नव्हता. त्याला वगळण्याबद्दल मला काही माहिती नव्हते. हा सर्वस्वी निर्णय निवड समितीचा होता, असा खुलासा भारताचा कर्णधार विराट कोहलीने आधीच केला आहे. विडिंजबरोबरच्या मालिका विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने हे स्पष्ट केले. धोनीला विडिंज आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील टी-२० मालिकेतून वगळल्यानंतर क्रीडा विश्वामध्ये आश्चर्य व्यक्त केले गेले आणि धोनीच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत निवड समिती व विराटवर सडकून टीका केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 12:01 pm

Web Title: ms dhoni stops the car to met little fan win hearts
टॅग : Fan,Ms Dhoni
Next Stories
1 आयपीएलमध्ये सहभागी व्हायचंय तर या अटी मान्य करा; क्रिकेट ऑस्ट्रेलियाची खेळाडूंना ताकीद
2 भारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली, खेळाडूची जीभ घसरली
3 मेरी कोमचे सहाव्या सुवर्णपदकाचे लक्ष्य
Just Now!
X