News Flash

धोनीचं टीम इंडियातलं पुनरागमन लांबणीवर? नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुट्टीवर जाणार

बांगलादेशच्या दौऱ्यात धोनी खेळण्याच्या आशा मावळल्या

महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत संघात संधी देण्यात आलेला यष्टीरक्षक ऋषभ पंतने गेल्या काही सामन्यांमध्ये फलंदाजीमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यातही ऋषभ बेजाबदार फटका खेळून माघारी परतला. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी पंतला संघाबाहेर बसवून धोनीला पुन्हा संघात स्थान द्या, अशी भावना बोलून दाखवली होती. मात्र धोनीचं टीम इंडियातलं पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मुंबई मिरर वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, धोनीने नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अवश्य वाचा – ऋषभ पंतवर इतक्या कठोर टिकेची गरज नाही !

विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनीने दोन महिन्यांची विश्रांती घेत विंडीज दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला होता. या काळात धोनीने लष्करात जाऊन सेवाही केली. मात्र नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे धोनी बांगलादेशचा भारत दौरा आणि विजय हजारे करंडकालाही मुकणार अशी चिन्ह दिसत आहेत. ‘मुंबई मिरर’ने सुत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे, त्यादरम्यान धोनीचं भारतीय संघात पुनरागमन होऊ शकतं.

मध्यंतरीच्या काळात धोनीच्या निवृत्तीवरुन अनेक चर्चांना उधाण आलं होतं. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने आपल्या ट्विटर एकाऊंटवर धोनीसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यावर सोशल मीडियामध्ये धोनी निवृत्ती घेणार आहे की काय??, अशा चर्चांना सुरुवात झाली. मात्र यानंतर विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होण्याआधी पत्रकार परिषदेत निवृत्तीच्या चर्चा चुकीच्या असल्याचं सांगितलं होतं. सुनिल गावसकरांसह अनेक माजी खेळाडूंनी धोनीला लवकरात लवकर निवृत्ती स्विकारण्याचा सल्ला दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 5:30 pm

Web Title: ms dhoni to remain unavailable for india selection till november psd 91
टॅग : Ms Dhoni
Next Stories
1 Pro Kabaddi 7 : तामिळ थलायवाजची निराशाजनक कामगिरी सुरुच, प्ले-ऑफच्या शर्यतीमधून बाहेर
2 Viral Video : पहावं ते अजबच… या शॉटला म्हणायचं तरी काय?
3 Pro Kabaddi 7 : विक्रमवीर प्रदीप नरवालचं द्विशतक, रचला अनोखा इतिहास
Just Now!
X