टीम इंडियाचे २०१९ विश्वचषक स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. संपूर्ण स्पर्धेत धोनीची संथ खेळी हा चर्चेचा विषय होता. यानंतर निवड समितीने धोनीशी चर्चा करून त्याला विश्रांती देत ऋषभ पंतला संधी दिली. मध्यंतरीच्या काळात धोनीला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळावं, अशी मागणी सोशल मीडियामधून होत होती, पण ते शक्य झालं नाही. अशा परिस्थितीत IPL मध्ये आपली चमक दाखवून धोनी संघात पुनरागमन करेल, असा चाहत्यांना विश्वास होता, पण दुर्दैवाने IPL स्पर्धा करोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे सध्या धोनी आपल्या फार्म हाऊसवर आपली पत्नी साक्षी आणि झिवा यांच्यासोबत वेळ घालवतो आहे.

सचिन म्हणतो, “…तेव्हा वाटलं ‘सोशल डिस्टन्सिंग’ गेलं खड्ड्यात”

धोनी अनेक महिने क्रिकेटपासून दूर जरी असला, तरी त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. धोनीला पुन्हा एकदा IPL मध्ये खेळताना पाहायची अनेकांची इच्छा आहे. पण सध्या तरी IPL अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्यामुळे ते शक्य नाही. पण IPL प्रेमींसाठी महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी हिने एक झकास पोस्ट शेअर केली आहे.

VIDEO : टिकटॉक व्हिडीओ सुरू असतानाच आवाज आला, “नको… नाही…”

त्या पोस्टमध्ये साक्षीने आपल्या बागेत दिसणार्‍या फुलांशी आयपीएल टीमच्या रंगांची तुलना केली आहे. झेंडूच्या फुलांची तुलना सीएसकेशी केली आहे, कारण ते संघाच्या जर्सीसारखे पिवळ्या रंगाचे आहेत. शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सची तुलना पर्पल क्वीन बोगनवेलशी तर मुंबई इंडियन्सची इंडिगोशी तुलना केली आहे. याशिवाय, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या जर्सीची तुलना फ्रांगीपानी आणि गुलाब या फुलांशी केली आहे. तर बोहिनिया फुलं ही राजस्थान रॉयल्स संघासारखी असल्याचं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

Reposting with explications for #ipl lovers !

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

ना धोनी, ना युवराज, ना गंभीर… या खेळाडूमुळे जिंकलो विश्वचषक – सुरेश रैना

दरम्यान, करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात वाढल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाउन सुरूच ठेवले आहे. या काळात सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झालेल्या असल्यामुळे सर्व खेळाडू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या आपल्या रांचीतल्या फार्महाऊसवर क्वारंटाइन झाला आहे. धोनीची पत्नी साक्षीने काही दिवसांपूर्वी आपल्या रांचीतल्या फार्महाउसचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. तसेच त्यानंतर लॉकडाउनच्या काळात धोनीची मुलगी झिवाला कंटाळा आल्यामुळे धोनीने तिला आपली बाईक काढत फार्महाउसची सफर घडवली होती.