News Flash

आयपीएल रद्द झाल्यास धोनीला टी-२० विश्वचषकात संधी मिळण्याची शक्यता कमीच !

माजी निवड समिती प्रमुखांचं मत

इंग्लंडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. न्यूझीलंडविरुर्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी हाराकिरी करत पराभव ओढवून घेतला. या संपूर्ण स्पर्धेत धोनीचा संथ खेळ हा चर्चेचा विषय ठरला होता. या स्पर्धेनंतर एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतला संधी दिली. यानंतर आतापर्यंत धोनी एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळलेला नाही. मध्यंतरीच्या काळात ऋषभ पंतच्या खराब कामगिरीमुळे धोनीला पुन्हा संघात संधी देण्याची मागणी होत होती, मात्र निवड समितीने पंतलाच आपली पसंती दर्शवली. आगामी टी-२० विश्वचषकासाठी धोनीला भारतीय संघात संधी आहे असं अनेक क्रिकेट तज्ज्ञांचं मत होतं.

अवश्य वाचा – आयपीएल विसरुन जा, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचे सूचक संकेत

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएलमध्ये चांगला खेळ केल्यास धोनीचा टी-२० विश्वचषकासाठी अजुनही विचार केला जाऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं. मात्र निवड समितीचे माजी प्रमुख कृष्णमचारी श्रीकांत यांच्यामते यंदाचं आयपीएल रद्द झाल्यास धोनीला टी-२० विश्वचषक संघात संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. “मी उगाच वेगळं काही उत्तर देणार नाही. मी सध्या निवड समितीवर असतो तर मी काय केलं असतं यावर मी बोलेन. यंदाचं आयपीएल झालं नाही तर धोनीला टी-२० विश्वचषक संघात संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. लोकेश राहुल यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून काम पाहू शकतो. ऋषभ पंतबद्दल मला अजुनही थोडीशी शंका आहे, पण तो गुणवान खेळाडू आहे यात काहीच शंका नाही.”

ऋषभ पंतला पर्याय म्हणून भारतीय संघात नक्की संधी देता येईल. पण आयपीएल रद्द झाल्यास धोनीला भारतीय संघात स्थान मिळवणं कठीण जाणार यात काहीच शंका नाही. धोनी आता भलेही शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल, तो महान खेळाडू आहे, मी स्वतः त्याचा चाहता आहे. पण आता विश्वचषकासाठीच्या संघाचा विचार सुरु आहे, त्यामुळे कोणत्या एका खेळाडूपेक्षा मला देशाचा विचार करणं अधिक महत्वाचं वाटतं, श्रीकांत यांनी धोनीच्या पुनरागमनाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. सध्या देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिता पाहता यंदाचं आयपीएल होणार की नाही याबद्द साशंकता निर्माण झालेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 1:23 pm

Web Title: ms dhonis chances for t20 world cup are very bleak if ipl doesnt happen says k srikkanth psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 आयपीएल विसरुन जा, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचे सूचक संकेत
2 Wisden च्या यादीत रोहित शर्माला स्थान नाही, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण म्हणतो…
3 आता फारकाळ घरात राहु शकत नाही, युजवेंद्र चहल लॉकडाउनला कंटाळला
Just Now!
X