अखेरच्या सामन्यात खेळण्यास एम.एस. धोनी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात धोनी मैदानावर खेळताना दिसण्याची शक्यता आहे. धोनी संघात परतल्यामुळे संघातून कोणत्या खेळाडूला डच्चू मिळेल, हे उद्याच्या सामन्यात कळेल. पण क्रीडा तज्ञांच्या मते दिनेश कार्तिकला संघातून वगळण्यात येऊ शकते. पदार्पणाच्या सामन्यात अवघ्या नऊ धावा करणाऱ्या शुभमन गिलला आणखी संधी मिळण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या सामन्यापूर्वी धोनीच्या पायाचे स्नायू दुखावले गेल्याने दोन सामन्यासाठी त्याला आराम देण्यात आला होता. आता तो संघात परतला आहे. पाचव्या सामन्यापूर्वी धोनीने कसून सराव केला. विराट-धोनीच्या अनुपस्थितीत भारताला दारूण पराभव स्विकारावा लागला होता. भारताचा अख्खा संघ फक्त ९२ धावांवर गारद झाला होता.

पाच एकदविसीय सामन्यात भारत ३-१ ने आघाडीवर आहे. पहिल्या तीन सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर चौथ्या सामन्यात न्यूझालंड संघाने भारताचा दारूण पराभव केला होता. आता पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ कसं प्रदर्शन करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीपुढे भारताताची भक्कम फलंदाजाची फळी कोसळली होती. अखेरच्या सामन्यात भारतीय संघात धोनीची निवड होण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंडला धक्का –
अखेरच्या एकदिवसीय सामन्यात यजमान न्यझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल दुखापतीमुळे अखेरच्या वनडे सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. अतिरिक्त सलामीवीर म्हणून न्यूझीलंड संघात कॉलिन मुन्रोला बोलवण्याता आले आहे. गप्टिलच्या दुखापतीवर उपचार सुरू असून तो फिजिओच्या निरिक्षणाखाली आहे.