News Flash

पंजाबचा खेळाडू ऑस्ट्रेलियात करोना पॉझिटिव्ह

गेल्या आठवड्यात पोहचला होता ऑस्ट्रेलियात

आयपीएलमधील पंजाब संघाकडून खेळणारा अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू मुजीब उर रेहमानला करोनाची लागण झाली आहे. बीग बॅश लीग खेळण्यासाठी मुजीब ऑस्ट्रेलियात आला होता. हॉटेलमध्ये क्वारंटनाइनमध्ये असताना मुजीबला करोनाची लागण झाल्याचं समजतेय.

गेल्या आठवड्यात काबूलवरुन मुजीब ऑस्ट्रेलियात आला होता. दोन आठवड्याच्या सक्तीच्या विलगीकरणामध्ये मुजीबमध्ये करोनाची लक्षणं दिसून आली होती. क्वारंटाइनच्या एक आठवड्यानंतर चाचणी केली असता मुजीबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार खबरदारीचा उपाय मुजीबला गोल्ड कोस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बिग बॅश लीग खेळण्यासाठी मुजीब आफगाणिस्तानच्या इतर खेळाडूबरोबर ऑस्ट्रेलियात पोहचला होता. मुजीबनं आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटोही पोस्ट केले होते. मोहमद्द नबी, नूर अहमद आणि झहिर खान या खेळाडूसोबत मुजीबनं प्रवास केला होता. हे सर्व खेळाडू दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले होते.दक्षिण ऑस्ट्रेलियात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुजीबच्या संपर्कातील सर्व खेळाडूंनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 3:21 pm

Web Title: mujeeb tests positive to covid 19 in hotel quarantine nck 90
Next Stories
1 राहुलची फटकेबाजी, टी-२० क्रिकेटमध्ये विराट-रोहित-धोनीच्या पंगतीत मिळवलं स्थान
2 परफेक्ट यॉर्कर! स्टार्कने उडवला शिखर धवनचा त्रिफळा; पाहा व्हिडीओ
3 सामना जिंकवून देणं हे माझं काम, संधी का मिळत नाही याचा फारसा विचार करत नाही !
Just Now!
X