News Flash

मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत क्रीडा संघ मालक, फोर्ब्सच्या यादीत अंबानी अग्रस्थानी

मायक्रोसॉफ्टच्या माजी सीईओना टाकलं मागे

मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत क्रीडा संघ मालक, फोर्ब्सच्या यादीत अंबानी अग्रस्थानी
मुकेश अंबानी- संग्रहीत छायाचित्र

रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे माजी चेअरमन स्टिव्ह बॉलमेअर यांना मागे टाकत मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत क्रीडा संघ मालक ठरले आहेत. फोर्ब्स मासिकाने ही यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयच्या इंडियन प्रिमीअर लिग स्पर्धेत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने मुंबई इंडियन्स या संघाची मालकी स्विकारली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये रिलायन्स उद्योग समुहाला मोठा आर्थिक फायदा झाला होता. ज्यामुळे रिलायन्सचे शेअर्स हे चांगले वाढले होते. फोर्ब्स मासिकाने दिलेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी हे भारतातले पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून जगभरातील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा 19 वा क्रमांक आहे. अंबानी यांच्या आधी ‘लॉस एंजलिस क्लिपर्स’ या बास्केटबॉल संघाचे मालक स्टिव्ह बॉलमेअर हे आघाडीवर होते, मात्र बॉलमेअर यांना मागे टाकत अंबानी यांना हा मान पटकावला आहे.

2008 साली मुकेश अंबानी यांनी रिलायन्स उद्योग समुहातर्फे 100 मिलीअन डॉलर्सची गुंतवणूक करत मुंबई इंडियन्स संघाची मालकी स्विकारली होती. याव्यतिरीक्त मुकेश अंबानी यांच्या नावावर अनेक जागाही आहेत. मुकेश अंबानी यांचा मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतो आहे. 2013, 2015 आणि 2017 या 3 हंगामाचं आयपीएलचं विजेतेपद मुंबईने पटकावलं होतं. याव्यतिरीक्त 2011 आणि 2013 सालच्या चॅम्पियन्स लीगचं विजेतेपदही मुंबई इंडियन्सने पटकावलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2018 2:21 pm

Web Title: mukesh ambani tops list of worlds richest sports team owner with mumbai indians
टॅग : Reliance
Next Stories
1 IND vs WI 1st ODI HIGHLIGHTS : भारताचा विंडीजवर ८ गडी राखून विजय
2 मधल्या फळीची भारताला चिंता
3 युवाभरारी!
Just Now!
X