30 May 2020

News Flash

माणुसकी हाच मोठा धर्म ! यंदाची ईद साजरी न करता मजुरांना मदत करण्याचा सरफराजचा निर्णय

सध्या मजुरांना मदतीची अधिक गरज

करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सर्व महत्वाच्या क्रिकेट स्पर्धा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. लॉकडाउन काळात सर्व भारतीय क्रिकेटपटू आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही खेळाडू या काळात गरजू लोकांना अन्नदान करण्यापासून ते घरी परतणाऱ्या मजुरांची मदत करत आपली सामाजित जबाबदारी पूर्ण करत आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधीत्व करणारा सरफराज खान सध्या उत्तर प्रदेशातील आपल्या घरी अडकलेला आहे. बाहेरील राज्यातून घरी परतणाऱ्या कामगारांना सरफराज मदत करतानाचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

यानंतर सरफराजने सध्याची परिस्थिती लक्षात घेता यंदाची ईद साजरी न करता मजुरांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. “आम्ही यंदा ईद साजरी करणार नाही असं ठरवलंय. ईदसाठी नवीन कपडे आणि वस्तू खरेदी करण्यासाठी जमवलेले पैसे मजुरांना मदत करण्यासाठी खर्च करायचं ठरवलं आहे.” ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनीही या काळात पुढे येऊन या गरजू लोकांना मदत करावी असं आवाहन सरफराजने केलं आहे. तो टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलत होता.

सध्या करोनाच्या भीतीमुळे अनेक मजूर गावी परतत आहेत. त्यांच्याकडे जेवणं, पाणी काहीही नसतं. अशा लोकांना आम्ही जेवणाची पाकीट आणि पाण्याच्या बाटल्या पुरवतो आहे. आम्हीही रमजानच्या काळात उपास करतो, त्यामुळे पाणी आणि अन्नाचं महत्व काय आहे याची आम्हाला जाणीव आहे, सरफराज बोलत होता. गेल्या हंगामात रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबईला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, परंतू सरफराजने आपल्या फलंदाजीची चमक दाखवत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 2:36 pm

Web Title: mumbai batsman sarfaraz khan vows to not celebrate eid will help migrant workers instead psd 91
Next Stories
1 भर कार्यक्रमात गंभीर-एमएसके प्रसाद यांच्यात जुंपली…
2 पुजाराला बाद करण्यासाठी वेगळा पर्याय शोधावा लागेल, ऑस्ट्रेलियन गोलंदाज आखतोय रणनिती
3 …तर कुंबळेला दहावी विकेट मिळाली नसती – वसीम अक्रम
Just Now!
X