News Flash

झारखंडवर दणदणीत विजयासह मुंबई दिमाखात उपांत्य फेरीत

फिरकीच्या जोरावर झारखंडची भंबेरी उडवत मुंबईने दिमाखदारपणे उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

फिरकीच्या जोरावर झारखंडची भंबेरी उडवत मुंबईने दिमाखदारपणे उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईने झारखंडपुढे विजयासाठी ४९० धावांचे आव्हान ठेवले होते. इक्बाल अब्दुल्ला व जय बिश्ता या दोन्ही फिरकीपटूंनी झारखंडच्या फलंदाजांना नाचवत त्यांचा अवघ्या ९५ धावांमध्येच खुर्दा उडवला आणि मुंबईने ३९५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
शिव गौतम (२७) आणि विराट सिंग (२६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी रचली. पण त्यानंतर मात्र झारखंडचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

संक्षिप्त धावफलक
मुंबई : ४१६ आणि २४५. विजयी वि. झारखंड : १७२ आणि ४२.२ षटकांत सर्व बाद ९५ (शिव गौतम २७, विराट सिंग २६; जय बिश्ता ५/१६, इक्बाल अब्दुल्ला ५/३५).
सामनावीर : अखिल हेरवाडकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 3:41 am

Web Title: mumbai beat jharkhand in ranji trophy
टॅग : Ranji Trophy
Next Stories
1 भारताची १४ सुवर्णपदकांची कमाई
2 पवन सधन तेजोमय!
3 भारताची दिमाखदारपणे उपांत्य फेरीत धडक
Just Now!
X