भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत मोठा विजय मिळवला. ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६४ धावांवर बाद झाला. अक्षर पटेलचे पाच बळी आणि रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादवची त्याला मिळालेली साथ यांच्या जोरावर भारताने इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला. सामन्यात आठ बळी घेणारा आणि दमदार शतक झळकावणारा रविचंद्रन अश्विन सामनावीर ठरला. भारताने दमदार पुनरागमन करूनही लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी या संघात तिसऱ्या कसोटीसाठी तीन बदल सुचवले.

CSKच्या स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

“मला असं वाटतं की जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करण्यास समर्थ असेल तर त्याला संघात स्थान देण्यात यायला हवं. मोटेराची खेळपट्टी नवीन असल्याने तेथे कशाप्रकारची खेळपट्टी असेल हे सांगणं कठीण आहे. पण माझा अंदाज आहे की या सामन्यात विराट तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरेल. याशिवाय, कुलदीप यादवच्या जागी जसप्रीत बुमराहला संघात परत घेण्यात आलं पाहिजे. बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज या तीन वेगवान गोलंदाजांना गुलाबी चेंडूने चांगली कामगिरी करता येऊ शकते”, असं मत गावसकर यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं.

IND vs ENG: पुढील दोन कसोटींसाठी भारताचा स्टार खेळाडू संघात परतणार?

“गुलाबी चेंडूची कसोटी असल्याने कुलदीपच्या फिरकीला तेथे फारसा वाव मिळणार नाही. त्यामुळे त्याला संघातून बाहेर केलं जाण्याची दाट शक्यता आहे. प्रकाशझोतात सामना खेळताना फिरकीपटू फारसे प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे कुलदीपच्या जागी बुमराहला संघात घ्यायलाच हवं”, असंही गावसकर म्हणाले.

IND vs ENG: विराटचं इंग्लंडच्या माजी कर्णधाराला सडेतोड उत्तर; म्हणाला…

असा रंगली दुसरी कसोटी-

इंग्लंडविरूद्ध पहिल्या सामन्यात लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीवर पहिल्या दिवसापासूनच वर्चस्व राखले. पहिल्या डावात भारताने ३२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला १३४ धावांत गुंडाळून १९५ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात २८६ धावा करत इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १६४ धावांवर आटोपला.