News Flash

मुंबईचा सेनादलावर सहज विजय

मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरचा अचूक मारा

| December 16, 2015 04:33 am

शार्दूल ठाकूर

मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरचा अचूक मारा आणि त्याला अन्य गोलंदाजांनी अपेक्षित साथ दिल्याने मुंबईला सेनादलावर सहा विकेट्सने सहज विजय मिळवता आला. तिखट मारा करत मुंबईने सेवादलाला १५१ धावांमध्येच गुंडाळले आणि हे आव्हान २५.२ षटकांमध्ये सहजपणे पूर्णही केले.
नाणेफेक जिंकत मुंबईने सेनादलाला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य असल्याचे दाखवून दिले. सेनादलाच्या नकुल वर्मा (५०) आणि रजत पलिवाल (४१) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर टिकता आले नाही. शार्दूलने वेगवान मारा करत सेवादलाच्या चार फलंदाजांना माघारी धाडले, तर धवल कुलकर्णी, शशांक सिंग आणि इक्बाल अब्दुल्ला यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
सेनादलाच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर अखिल हेरवाडकर (४६) आणि श्रेयस अय्यर (३५) यांनी चांगली धावसंख्या रचली.

संक्षिप्त धावफलक
सेनादल : ४२.१ षटकांत सर्व बाद १५१ (नकुल वर्मा ५०; शार्दूल ठाकूर ४/१९) पराभूत वि. मुंबई : २५.२ षटकांत ४ बाद १५६ (अखिल हेरवाडकर ४६; अझरुद्दीन ब्लोच २/२७)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 4:33 am

Web Title: mumbai defeat sena dal
Next Stories
1 अमर िहद, जे. जे. हॉस्पिटल, जेपीआर अजिंक्य
2 ‘हुकमाचा सामना’ आणि बरेच काही..
3 भारताचा इंग्लंडवर विजय
Just Now!
X