News Flash

मुंबई जिल्हा कबड्डी स्पर्धा : एअर इंडिया, बँक ऑफ बडोदा अजिंक्य

महिलांमध्ये बँक ऑफ बडोदाने जे.जे. रुग्णालयाचा २६-०५ असा धुव्वा उडवला.

विजेता एअर इंडियाचा संघ.

मुंबई : मुंबई जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया आणि बँक ऑफ बडोदा (देना बँक) या संघांनी अनुक्रमे पुरुष विशेष व्यावसायिक आणि महिला व्यावसायिक गटाचे विजेतेपद पटकावले.

वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंदिर क्रीडांगणावर झालेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाने बँक ऑफ बडोदाला ३७-१३ असे सहज पराभूत केले. नवनाथ जाधव, आकाश कदम यांच्या धारदार चढाया आणि साईराज कुंभार याच्या भक्कम बचावाला या विजयाचे श्रेय जाते. बँकेचा भरवशाचा खेळाडू नितीन देशमुख आणि आकाश गोजारे अपयशी ठरले.

महिलांमध्ये बँक ऑफ बडोदाने जे.जे. रुग्णालयाचा २६-०५ असा धुव्वा उडवला. बँकेच्या साक्षी रहाटे, पौर्णिमा जेधे यांच्या झंझावाती आक्रमणाला रोखणे आणि आरती पाटील, साधना विश्वकर्मा यांचा बचाव भेदणे जेजे संघाच्या महिलांना जमत नव्हते. जेजे संघाच्या अक्षया कुटेला या सामन्यात सूर सापडला नाही.

प्रथम श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात जय भारत क्रीडा मंडळाने अंकुर स्पोर्ट्स क्लबला २५-२२ असे नामोहरम केले. जय भारतच्या ओमकार मोरे, अक्षय जाधव, अविनाश कावीलकर यांनी उत्तरार्धात जोरदार पुनरागमन करीत हा विजय साकारला. अंकुल संघाच्या सुशांत साईल, अभिजित दोरुगडे, आशीष सातारकर यांनी पूर्वार्धात चतुरस्र्र खेळाचे प्रदर्शन केले.

महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्ती महिला ‘अ’ संघाने डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबचा ५१-१८ असा धुव्वा उडवला. पूजा यादव, ऋणाली भुवड यांच्या धारदार चढायांना साधना विश्वकर्मा, आरती पाटील यांनी दिलेली भक्कम पकडीची साथ यामुळे हे सहज शक्य झाले. धनश्री पोटले, तेजश्री चौगुले, साक्षी यांचा खेळ डॉ. शिरोडकरचा पराभव टाळण्यास फारच कमी पडला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:01 am

Web Title: mumbai district kabaddi competition air india bank of baroda win title zws 70
Next Stories
1 अ. भा. मानांकन टेनिस स्पर्धा : महाराष्ट्राच्या सालसाला दुहेरी विजयाची संधी
2 “हिंदू होता म्हणून त्याला पाकिस्तानचे क्रिकेटपटू द्यायचे त्रास”; शोएब अख्तरचा गौप्यस्फोट
3 …म्हणून त्याने धवनला मारल्या लाथा, चूक लक्षात येताच मागितली माफी