मुंबईने सौराष्ट्राचा २० धावांनी पराभव करीत महिलांच्या पश्चिम विभागीय ट्वेन्टी२० क्रिकेट स्पर्धेत आव्हान राखले. अन्य लढतीत गुजरातने बडोद्यावर ३९ धावांनी मात केली. या स्पर्धेत मुंबईने सौराष्ट्राविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १४० धावा केल्या. त्यामध्ये सारिका कोळी (४७) व श्रेयाल रोझारिओ (नाबाद ५०) यांनी केलेल्या शैलीदार फलंदाजीचा वाटा होता. जयश्री जडेजा (३३) व मृदुला जडेजा (३०) यांनी दमदार सलामी करुनही सौराष्ट्रास २० षटकांत ७ बाद १२० धावांपर्यंतच पोहोचता आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2013 3:43 am