रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा एकही फलंदाज साजेशी कामगिरी करु शकला नाही. ख्रिस लिनचे अर्धशतकही अवघ्या धावेने हुकले. असे असले तरी अवघ्या ७ धावा करणाऱ्या कृणाल पंड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चेन्नई मैदानावरील सामन्यात जेमीसनने टाकलेला यॉर्कर चेंडू खेळताना कृणाल पंड्याची बॅट तुटली आणि अक्षरश: हातात दांडा आला.

अष्टपैलू काईल जेमीसनकडे कर्णधार विराट कोहलीने १९ वे षटक सोपवले. तेव्हा त्याने फलंदाजी करत असलेल्या कृणाल पंड्याला बाद करण्यासाठी यॉर्कर टाकला. त्रिफळा वाचवण्याच्या प्रयत्नात कृणाल पंड्याने चेंडू अडवला खरा मात्र बॅट तुटली. हातात नुसता दांडा बघून त्यालाही आश्चर्य वाटलं. सध्या हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी त्याला मजेशीर कमेंट्सही देत आहेत.

 

कृणाल पंड्याने बॅट बदलून पुन्हा एकदा खेळायला सुरुवात केली. मात्र या सामन्यात केवळ ७ धावा करून बाद झाला. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर तो डॅन ख्रिश्चनच्या हाती झेल देऊन बाद झाला.

अबब! मुंबई इंडियन्सचा 6 फूट 8 इंचाचा क्रिकेटपटू तुम्हाला माहीत आहे का?

नाणेफेक जिंकून आरसीबीने मुंबई इंडियन्सला फलंदाजीचं निमंत्रण दिले होते. या सामन्यात मुंबई चांगली धावसंख्या उभारेल, अशी आशा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना होती. मात्र ख्रिस लिन वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही. मुंबई इंडियन्सला १५९ धावसंख्या उभारता आली.