24 November 2020

News Flash

IPL 2020 : ‘मुंबई इंडियन्स’च्या सगळ्यात मोठ्या चाहतीवर CSK फिदा..

त्या ट्विटमध्ये CSK ने दोन महत्त्वाचे हॅशटॅगदेखील वापरले आहेत

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) साठी डिसेंबरमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियेची सगळे संघमालक आणि चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. IPL मध्ये मुंबई इंडियन्स हा सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईला IPL चा सर्वात यशस्वी संघ बनवण्यामागे संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा मोठा वाटा आहे. IPL 2019 मध्ये मुंबईच्या संघाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आणि चौथ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या हंगामात प्रथमच रोहितची मुलगी समायरा ही स्टेडिअममधून वडिलांना चिअर करताना दिसली. पण, मुंबई इंडियन्स संघाशी ‘खुन्नस’ असलेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाच्या मते मात्र समायरा ही मुंबईची नव्हे, तर महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई संघाची फॅन आहे.

Photo Gallery : विराट-अनुष्काची रोमँटिक दिवाळी; पहा ‘विरूष्का’चं खास सेलिब्रेशन

रोहित आपल्या चाहत्यांसाठी सतत आपली मुलगी समायरा हिचे फोटो शेअर करत असतो. रोहितने नुकताच चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पत्नी रितिका आणि मुलगी समायरा हिच्यासोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला. समायराने या फोटोमध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. हा फोटो आणि आणखी एक फोटो एका फॅनने ट्विटरवर पोस्ट केला. हाच फोटो चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावर शेअर करत त्याखाली ‘रोहितची मुलगी समायरा आता CSK ची फॅन झाली आहे’, असे लिहिले. मुंबईने गेल्या वर्षी IPL सुरू होताना समायरासाठी एक छोटी जर्सी तयार करत हा आमचा सगळ्यात मोठा फॅन आहे, असं म्हटलं होतं. (IPL Final 2019 : रोहितची चिमुकलीही तयार.. पहा खास फोटो)

पण CSK ने समायराचा दुसरा फोटो शेअर केला आहे. तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवर यूजर्सने रोहित आणि ‘मुंबई इंडियन्स’ला टॅग केले आहे.

दरम्यान, IPL 2019 मध्ये मुंबई इंडियन्स सुरुवातीला संघर्ष करताना दिसला. पण, रोहितच्या नेतृत्वात संघाला यश मिळाले. रोहितच्या नेतृत्वात मुंबई संघाने ४ वेळा IPL चे जेतेपद मिळवले. तर धोनीच्या नेतृत्वातील CSK ने ३ वेळा विजतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. IPL मधील रोहितच्या नेतृत्वाकडे पाहता त्याला भारताच्या टी २० संघाचा कर्णधार बनवावा, अशी मागणी केली जात होती. तसेच, विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर पहिल्यांदाच त्याला भारताच्या टेस्ट संघात सलामीला येण्याची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून रोहितने सलामीवीर म्हणून दमदार कामगिरी करून दाखवली. आफ्रिकेविरुद्ध रोहितने ४ डावांत ५२९ धावा केल्या. यात दोन शतके आणि एक द्विशतकाचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 7:07 pm

Web Title: mumbai indians chennai super kings ipl rohit sharma daughter samaira biggest fan csk tweet
Next Stories
1 “टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू दशकातील सर्वात भारी फिल्डर”
2 श्रीलंकेचा रजिता ठरला टी२० तील महागडा गोलंदाज; दिल्या *** धावा
3 ईडन गार्डन्सवर दिवस-रात्र कसोटी?
Just Now!
X