08 July 2020

News Flash

आयपीएलचं बिगुल वाजलं ! मुंबई-चेन्नईमध्ये रंगणार सलामीची झुंज

२९ मार्चला खेळवला जाणार सलामीचा सामना

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात २९ मार्चरोजी सलामीचा सामना रंगणार आहे. Espncricinfo संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केलेली नसली तरीही काही संघानी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेळापत्रक जाहीर केलं आहे.

मार्च महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळेल. १८ मार्चरोजी कोलकात्यात तिसरा वन-डे सामना खेळवल्यानंतर बरोबर ११ दिवसांनी आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तेराव्या हंगामात शनिवारी Double Header सामन्यांची संख्या कमी करण्यात आलेली असून, संपूर्ण हंगामात केवळ ५ Double Header सामने खेळवले जाणार असून ते रविवारी खेळवले जातील. १७ मे रोजी विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 8:33 am

Web Title: mumbai indians chennai super kings to kick off ipl 2020 no double headers on saturdays psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 मँचेस्टर सिटीचे कारवाईला आव्हान
2 राष्ट्रीय कुमार कबड्डी स्पर्धा : महाराष्ट्राच्या मुली उपांत्यपूर्व फेरीत फेरीत
3 आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धा : भारताला कांस्यपदक
Just Now!
X